ग्रामीण भागातील आरोग्य विभागात औषधांचा "दुष्काळ"

ग्रामीण भागातील आरोग्य विभागात औषधांचा "दुष्काळ"
Published on: 
मेन ग्रामीण भागात आरोग्य विभागात औषधांचा दुष्काळ -------------------------------------------- मालेगाव तालुक्यातील १२५ खेड्यातील शिबीरात पुढे आले वास्तव सकाळ वृत्तसेवा मालेगाव कॅम्प, ता.२१ : मालेगाव तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागात गेल्या दोन महिन्यांपासून औषधांचा तुटवडा भासत आहे. एप्रिल २०२६ ते ३० मार्च २०२७ या काळात ''माझे गाव - आरोग्य संपन्न गाव" अभियानात तालुक्यातील १२५ खेड्यातील महिला व नागरिकांच्या आरोग्य विषयक विविध तपासणी, गरोदर माता तपासणी, रक्ताच्या चाचण्या व बीपी, शुगर तपासणी करून त्यावर उपचार केले जात आहे. परंतु त्यासाठी औषधांची मोठी गरज असताना औषधेच मालेगाव आरोग्य विभागात उपलब्ध नसल्याचे वास्तव्य समोर आले आहे. आरोग्य यंत्रणेचा औषध तुटवड्याचा हा प्रकार यानिमित्ताने पुढे आला आहे. औषधांची मागणी करूनही औषधे उपलब्ध होत नसतील तर आरोग्य यंत्रणा काय करत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी व विविध ग्रामपंचायत प्रशासकांनी औषधांची मागणी आरोग्य विभागाकडे करून देखील ते मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. असा नागरिकांच्या तक्रारी आहेत. प्राथमिक औषधांचा तुटवडा ग्रामीण भागातील जनतेसाठी विविध आजारावर क्षयरोग, टी. बी, कॅल्शियम, साथीचे रोग यासह अन्य २० पेक्षा अधिक आजारांसाठी औषधांची गरज डॉक्टर, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, परिचारिका यांना नागरिकांच्या उपचारासाठी भासते. परंतु दोन महिण्यापासून औषधा विना उपचार सुरू असल्याचे भयावह वास्तव्य ग्रामीण भागातील विविध गावात निदर्शनास आले आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उप केंद्रावर औषधा संदर्भात काही अंशी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लवकरात लवकर विविध आजरावारील औषधांचा साठा उपलब्ध करून तालुक्याची आरोग्य सेवा बळकट करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ----- कोट तालुका स्तरावर जे औषधे उपचारासाठी लागतात त्याची वरिष्ठ पातळीवर मागणी केली आहे. जे उपलब्ध होते ते आणले आहेत. काही औषधे शिल्लक नाहीत ते लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या पुढे ग्रामीण भागाची आरोग्याची काळजी व त्यासाठी लागणाऱ्या औषधांचा तुटवडा भासणार नाही. - आकाश भद्रे, तालुका आरोग्य अधिकारी, पं. स. मालेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com