
नाशिक तालुका हद्दीत पोलिस शिपायाचा धुडगूस
नाशिक : नाशिक तालुका हद्दीतील एका पोलिस ठाण्यामध्ये पोलिस शिपायाने मंगळवारी रात्री दारू पिऊन प्रचंड धुडगूस घातल्याचे वृत्त समोर आले आहे. या पोलिस शिपायाची दहशत एवढी आहे, की संबंधित पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनादेखील त्याने दारूच्या नशेत शिवीगाळ केली. त्यामुळे आता या पोलिस शिपायावर कारवाई होणार का, हा प्रश्न आहे.
हेही वाचा: प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोघा लाचखोर अधिकाऱ्यांना अटक
नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाला सर्वप्रथम या पोलिस शिपायाचा शोध घ्यावा लागणार आहे. मोठ्या गुन्ह्यांचा शोध घेणाऱ्या पोलिसांसाठी ही बाब फार विशेष नाही. केवळ एकाच पोलिस ठाण्यात नव्हे, तर तब्बल तीन ते चार पोलिस ठाण्यांच्या परिसरात या संबंधित पोलिस शिपायाची मोठी दहशत आहे.
ही दहशत खपवून घेण्याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी मनमानी केल्यानंतरदेखील बेशिस्त वर्तणुकीनंतरही या पोलिस शिपायाची तक्रार केवळ दबक्या आवाजात मर्यादित आहे. या प्रकरणामागे या पोलिस शिपायावर वरिष्ठ पातळीवरील पोलिस अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने कारवाईस टाळाटाळ होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे तब्बल तीन ते चार पोलिस ठाण्यांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये या पोलिस शिपायावर कारवाईची प्रतीक्षा आहे.
हेही वाचा: मोबाईल दाखविण्याचा बहाणा करीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Web Title: Drunk Police Constable Vulgar Behaviour With Senior Inspectors And Staff In Nashik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..