Nashik : पेट्रोलपंपांवर ‘ड्राय डे’; BPCLचे बहुतांश पंप बंद

Closed Petrol Pump
Closed Petrol Pumpesakal

नाशिक : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) कंपनीमार्फत इंधन पुरवठा (Fuel Supply) होत नसल्‍याने शहरासह जिल्‍हाभरातील कंपनीचे बहुतांश पेट्रोलपंपांचा साठा संपला आहे. विविध मागण्यांसाठी पेट्रोलपंप चालकांच्‍या संघटनेने उद्या (ता.३१) खरेदी बंद आंदोलन पुकारलेले असताना या पार्श्वभूमीवर इंधन भरण्यासाठी सोमवारी (ता.३०) पंपांवर मोठ्या रांगा लागलेल्‍या बघायला मिळाल्‍या. अशात येत्या एक- दोन दिवस इंधनाचा तुटवडा जाणवण्याची तीव्र शक्‍यता निर्माण झाली आहे. (Dry day at petrol pumps Most of BPCL pumps shut off Nashik News)

बीपीसीएल कंपनीला आगाऊ पैसे भरूनही माल उपलब्‍ध होत नसल्‍याची तक्रार पेट्रोलपंप चालकांनी केलेली आहे. दरम्‍यान केवळ वीस ते तीस टक्‍के माल उपलब्‍ध करून दिले जात असल्‍याचे काहींकडून सांगण्यात आले. शहरासह जिल्ह्यात‍ या कंपनीच्‍या पंपांची संख्या सर्वाधिक असल्‍याने इंधनाअभावी जनसामान्‍यांना मनस्‍तापाला सामोरे जावे लागते आहे. हे पंप बंद असल्‍याने व उद्याच्‍या संभाव्‍य आंदोलनाच्‍या पार्श्वभूमीवर सोमवारी अनेक पंपासमोर वाहनचालकांच्‍या मोठ्या रांगा लागलेल्‍या बघायला मिळाल्‍या. खरेदी बंद आंदोलन पुकारले असले तरी पंपावर साठा उपलब्‍ध असेपर्यंत इंधन विक्री करणार असल्‍याचे यापूर्वीच पेट्रोलपंप चालकांच्‍या संघटनेमार्फत स्‍पष्ट केले आहे.

Closed Petrol Pump
Closed Petrol Pumpesakal
Closed Petrol Pump
पोट पाणी महत्त्वाचे की हनुमान जन्मस्थळ वाद?; भुजबळांचा सवाल

ग्रामीण भागात शेतीकामे रखडली

बीपीसीएल कंपनीचे पंप असलेल्‍या गावाभोवतीच्या शेतकऱ्यांना डिझेल उपलब्‍ध होण्यात अडचणी उद्भवता आहेत. त्यामुळे शेती मशागतीची कामे रखडलेली आहेत. नजीकच्‍या ठिकाणी जाऊन डिझेलची तजवीज करावी लागत असल्‍याचे चित्र आज दिवसभरात बघावयास मिळाले.

Closed Petrol Pump
'माफी मागा...' बोलता बोलता स्वामींनी उगारला माईक, नाशकात साधूंचा राडा
Closed Petrol Pump
Closed Petrol Pumpesakal

शहरात कुठे बंद, तर कुठे रांगा

जिल्ह्यात सुमारे साडे चारशे पंप आहेत. यापैकी ऐंशी पंप नाशिक शहर परिसरात आहेत. शहरातील साठा संपलेले पंप बंद ठेवण्यात आले होते. तर जेथे इंधन उपलब्‍ध आहे, अशा पंपांवर मोठ्या रांगा लागलेल्‍या बघायला मिळाल्‍या. दरम्‍यान दुचाकी वाहनातील पेट्रोल संपल्‍यानंतर अनेक ठिकाणी फिरूनही पेट्रोल उपलब्‍ध होत नसल्‍याने अनेकांना वाहन ढकलण्याची वेळ ओढवल्याचेही दिसून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com