चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर चिचोंडीत पशुपालकांना मार्गदर्शन कोरडा फेकून न देता पक्रियेद्वारे आणा आता वापरात, कोरड्या चाऱ्यावर युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक तीस दिवसात जनावरांना खाण्यायोग्य होणार

चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर चिचोंडीत पशुपालकांना मार्गदर्शन कोरडा फेकून न देता पक्रियेद्वारे आणा आता वापरात, कोरड्या चाऱ्यावर युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक तीस दिवसात जनावरांना खाण्यायोग्य होणार
Published on: 
----------- पान-३ अँकर फोटो- 02938 चिचोंडी बुद्रुक (ता. येवला) : संभाव्य चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर कोरड्या चाऱ्यापासून पौष्टिक चारा बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविताना सहाय्यक उपायुक्त डॉ. जगदीश पालवे, डॉ. प्रदीप दाणे, डॉ. प्रताप अनर्थे, रोकडे आदी. कोरड्या चाऱ्याचा यूरिया प्रक्रियेद्वारे पुनर्वापर चिचोंडीत पशुपालकांना संभाव्य चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन ---------------- प्रमोद पाटील : सकाळ वृत्तसेवा चिचोंडी, ता. २७ : संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती, येवला यांच्यातर्फे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ राबविण्यात आले. या अभियानांतर्गत परिसरातील पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच कोरड्या चाऱ्यावर यूरिया प्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. पुढील आठ महिने उद्भवणारी पाणीटंचाई, चाराटंचाई लक्षात घेऊन उपलब्ध चाऱ्याचे व्यवस्थापन करून पशुधनाची काळजी घेणे आवश्यक आहे. शेतातील वाळलेला चारा किंवा भुसा जाळून न टाकता त्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करून त्याची पौष्टिकता वाढवावी आणि पशुखाद्य म्हणून त्याचा वापर कसा करावा, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. येवला तालुका पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक उपायुक्त डॉ. जगदीश पालवे यांनी कोरड्या चाऱ्यावर यूरिया प्रक्रिया करून त्याची गुणवत्ता सुधारण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच मुरघास तयार करताना घ्यावयाची काळजी, चाऱ्याची योग्य साठवणूक आणि टंचाईच्या काळात उपलब्ध चाऱ्याचा काटकसरीने वापर करण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले. पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रताप अनर्थ्रे यांनी दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे आरोग्य आणि पोषण टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली. कृत्रिम रेतन तंत्रज्ञ डॉ. प्रदीप दाणे यांनीही चारा व्यवस्थापन व संवर्धनाबाबत प्रात्यक्षिक दाखवले. डॉ. हरीश रोकडे, डॉ. मुकुंद सोनवणे, निवृत्ती मढवई यांच्यासह परिसरातील पशुपालक उपस्थित होते. यूरिया प्रक्रियेची माहिती आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिक मिळाल्याने पशुपालकांनी समाधान व्यक्त केले. निकृष्ट प्रतीच्या कोरड्या चाऱ्यावर योग्य शास्त्रीय प्रक्रिया करून त्याचा पौष्टिक पशुखाद्य म्हणून उपयोग करता येतो. त्यामुळे चाराटंचाईच्या काळात पशुपालकांना या उपक्रमाचा लाभ होईल, असा विश्वास उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला. -- चौकट अशी करावी प्रक्रिया कोरड्या सुक्या चाऱ्यावर, भुशावर यूरिया ट्रीटमेंट करून चारा सकस बनवण्यासाठी शंभर किलो कोरडा चारा किंवा भुसा, त्यावर टाकण्यासाठी यूरिया चार किलो, गूळ दोन किलो, जाड मीठ एक किलो, क्षार मिश्रण पावडर एक किलो, पाणी २५ ते ३० लिटर हे द्रावण कोरड्या चाऱ्याचा चार ते सहा इंचाच्या प्रत्येक थरावर झारीने समप्रमाणात टाकून तो चारा चांगला हलवून घेऊन मग त्यावर दुसरा थर द्यावा. २८ दिवसांनंतर हा चारा जनावरांना खाण्यायोग्य होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com