फोटो -NSK26H33674
नाशिक : येथे डी. एस. मिल्सच्या शाखेचे उद्घाटन करताना पालकमंत्री गिरीश महाजन व नीलिमा पवार. शेजारी नीलेश बोरा, सुनील धवर, गोकूळ गिते, बाळासाहेब सानप, निर्मला माहेश्वरी, कावेरी मनियार, कृष्णा मनियार, रवींद्र मनियार, अनिल बुब, सतीश मनियार, गुणवंत मनियार आदी.
डी. एस. मिल्सच्या शाखेचे
पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२७ : देशभरात ९०हून अधिक शाखा असलेल्या द्वारकादास शामकुमार अर्थात डी. एस. टेक्स्टाईल्स मिल्सच्या येथील शाखेचे उद्घाटन पालकमंत्री व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्रात १ लाख स्वे. फुटाचे दालन फक्त नाशिकमध्ये प्रथमच सुरू झाले असून त्याचे उद्घाटन करण्याचा मला मान मिळाला हे नाशिकच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असल्याचे मंत्री महाजन यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितले. द्वारकादास शामकुमार (डीएस मिल्स) या दालनामध्ये भारतातील विशाल, पल्लवी, एसआर, सुचित्रा, नालव नॅशनल, झेनित पटी, सत्यम अशा अनेक नामांकित कंपन्यांच्या साड्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सिल्कमध्ये बंगलोर सिल्क, कांजीवरम सिल्क, धर्मावरम सिल्क, कलकत्ता सिल्क, कलकत्ता वर्क, खास जयपुरी वर्क, ड्रेस मटेरियल, शरारा, कॉट सेट, वनपीस गाऊन, शर्टिंग-शुटिंग, रेडिमेड टी-शर्ट व हँडलूममध्ये असंख्य व्हरायटीज उपलब्ध आहेत. रिटेल ग्राहकांना कमीत कमी चार पीस किंवा सहा पीसच्या सेटमध्ये होलसेल भावात खरेदी करता येईल. जिल्ह्यातील व्यापारी व घरगुती व्यावसायिकांना आता मुंबई, सुरत, कलकत्ता येथील दरात साड्या व विविध प्रकारचे सिल्क, ड्रेस मटेरिअल नाशिकमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. नाशिककरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालकांनी केले आहे.