लॉकडाउनमुळे विक्रीअभावी शेतमाल पडून; शेतकरी आर्थिक संकटात

farmer
farmerfarmer
Summary

नाशवंत मेथी, कोथिंबिरीसारख्या पालेभाज्या व मिरची, टोमॅटो कवडीमोल भावाने विक्री किंवा फेकून देण्याची वेळ आल्यामुळे शेतकऱ्यांची तीव्र नाराजी

कंधाणे (जि. नाशिक) : कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात लॉकडाउन (Lockdown) करण्यात आले आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये वाहतुकीवर बंधने असल्याने फळे, भाजीपाला व इतर शेतमाल विक्रीअभावी शेतातच पडून आहे. नाशवंत मेथी, कोथिंबिरीसारख्या पालेभाज्या व मिरची, टोमॅटो कवडीमोल भावाने विक्री किंवा फेकून देण्याची वेळ आल्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. (Farm produce vegetables lack of sales due to lockdown Farmers in financial crisis)

मालाची कवडीमोल विक्री

जिल्ह्यात विशेषतः कसमादे पट्ट्यात कांदा काढणीनंतर खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीपूर्वी व त्यासाठी लागणाऱ्या बी- बियाणे, रासायनिक खते व खर्चासाठी भांडवली खर्च भागविण्यासाठी कोबी, टोमॅटो, मेथी, कोथिंबिर यासारखी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. तयार शेतमाल व्यापारी बांधावर येऊन खरेदी करून गुजरात, दीव-दमण व इतर ठिकाणी विक्रीसाठी पाठवितात. त्यामुळे शेतकऱ्यांची मजुरी, वाहतूक, आडत, हमाली व अन्य खर्चात बचत होऊन दोन पैसे पदरी पडतात. परंतु, लॉकडाउनच्या काळात व्यापाऱ्यांनी शेतमाल खरेदीसाठी पूर्णपणे पाठ फिरवल्याने स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी वेळेचे बंधन व आवक जास्त असल्यामुळे मालाला उठाव होत नाही. त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसत असून, हाती असलेल्या मालाची कवडीमोल विक्री किंवा मागणीअभावी तो फेकून द्यावा लागत आहे. आधीच अवकाळी, गारपीट व तौक्ते वादळातून वाचलेला व आता काढणीला आलेला शेतमाल विक्रीअभावी मातीमोल होत आहे.

farmer
VIDEO : मोदी सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी - महसूलमंत्री थोरात

''टोमॅटो व मिरची झाडावर पिकून गळायला लागली आहे. तसेच, मेथी, कोथिंबीरची पूर्ण वाढ झाल्याने तीही पिवळी पडायला सुरवात झाली आहे. या शेतात काही दिवसांत खरिपाच्या पेरणीसाठी मेंढ्या चारणे किंवा नांगरट करण्याशिवाय पर्याय दिसत नाही.''

- दिनेश बिरारी, शेतकरी, कंधाणे

(Farm produce vegetables lack of sales due to lockdown Farmers in financial crisis)

farmer
नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे वेध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com