Nashik News : अल्प दरामुळे भाजीपाला मातीमोल!; शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vegetable market

Nashik News : अल्प दरामुळे भाजीपाला मातीमोल!; शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली

जुनी शेमळी (जि. नाशिक) : कोथिंबिर, फ्लॉवर, भेंडी, कोबी, मेथी, टोमॅटो, भोपळा, मिरची गाजर या प्रमुख भाजीपाला पिकाला बाजारपेठेत कवडीमोल दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. (Due to low price vegetables expensive financial condition of farmers deteriorated Nashik News)

ढगाळ वातावरणामुळे महागडी औषधे फवारणी करुन व मोठ्या कष्टाने जतन केलेला भाजीपाला बाजारात कवडीमोल ठरत आहे. कोथिंबीर, मेथी, फ्लॉवर, कोबी, भेंडी, काकडी, मिरची आदी महागडी रोपे खरेदी करुन लागवड केली. भाजीपाला आवक वाढल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्यावर झाला.

अचानक वातावरणात बदल व रोगांचा प्रार्दुभाव झाल्याने महागडी औषधे खरेदी करुन मोठ्या मेहनतीने भाजीपाला वाचविला. परंतु, भाव मिळत नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे. गाडीभाडे देखील सुटत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

हेही वाचा: Nashik News : गणेशनगर येथील खडीक्रेशर सील; विनापरवाना उत्खननावर जिल्हा प्रशासनाची कारवाई

मुलांचे लग्न, शिक्षण, आजारपण इतर सर्व जबाबदाऱ्या पेलताना शेतकऱ्यांची कसरत होत आहे. मुलीचे लग्न व कर्ज कसे फेडायचे, या संकटात शेतकरी सापडला आहे. शेतीसाठी लागणाऱ्या भांडवलाची पुन्हा चिंता भेडसावत आहे. आर्थिक गणित चुकण्यामागे बाजारभाव हेच प्रमुख कारण आहे. बियाणे, खते, रासायनिक औषधे, मजुरीचा खर्च निघणेही मुश्‍किल झाले आहे.

एका पिकाला बाजारभाव नाही मिळाला की सावरण्यासाठी पुन्हा दुसऱ्या पिकाचे नियोजन केले जाते. मात्र, त्यालाही भाव मिळत नाही. परिणामी, उभ्या पिकात नांगर फिरवणे, मेंढ्या चारण्याची वेळ येते. तेव्हा शेतकऱ्यांना वेदना सहन कराव्या लागतात.

हेही वाचा: Rajya Natya Spardha : ‘मोनोटोनी’तला सुवर्णमध्य ‘सौभाग्यवती चिरंजीव’!