Online Shoppingने बाजारपेठा ओस; मनमाडला ऐन दिवाळी व्यावसायिकांमध्ये चिंता

Online Shopping News
Online Shopping Newsesakal

मनमाड (जि. नाशिक) : कामगार वस्तीचे शहर असलेल्या मनमाड शहरात सध्या सण- उत्सवाची चलबिचल दिसत आहे. दिवाळीच्या निमित्ताने काही कामगारांच्या हाती बोनस आला असला तरी काही कामगारांच्या हाती बोनस येणे बाकी आहे. सध्या बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी ग्राहक येणार या आशेवर व्यापारी असताना ग्राहकांचा मात्र ऑनलाईन खरेदीकडे कल असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. (due to Online Shopping market offline market Businessman worries in diwali festival nashik Latest Marathi News)

Online Shopping News
Smart City Companyकडून पुन्हा एकदा 2 Cycle track बनवण्याचा निर्णय

पूर्वी दिवाळी जवळ आली की पंधरवड्यापासून खरेदीसाठी नागरिकांची धावपळ दिसत. नवीन कपडे, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत होती. मात्र, दोन ते तीन वर्षांमध्ये सर्वत्र ऑनलाइन खरेदीचा बोलबाला होत आहे. सध्या निर्बंधमुक्त सर्वच सण- उत्सव साजरे होत असून, सर्व भागातील बाजारपेठा पूर्वपदावर आल्या आहेत. यातच दिवाळीनिमित्त विविध वस्तूंनी बाजारपेठा सज्ज होत असताना ऑनलाइन वस्तूंना मिळत असलेल्या वाढत्या मागणीचा फटका बाजारपेठेला सहन करावा लागत आहे.

शहराप्रमाणे ग्रामीण भागातही ऑनलाइन खरेदीचा कल वाढत आहे. खासकरून तरुणाई मोठ्या प्रमाणात ऑनलाइन वस्तूंची खरेदी करीत आहे. यामुळे दिवाळीच्या निमित्ताने बाजारात खरेदीसाठी होणारी गर्दी हळूहळू कमी होत असून, उत्सवानिमित्त सज्ज झालेल्या बाजारपेठा ग्राहकांअभावी ओस पडत आहेत. यातच ऑनलाइन खरेदीमुळे ग्राहकांना मोठी सूट मिळत असल्याने ग्राहकांचा या खरेदीकडे मोठा कल दिसून येत आहे.

ऑनलाइन खरेदीचे लोन ग्रामीण भागातही पोहचले आहे. शहरी भागात तरुणांकडून ऑनलाइन खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. या खरेदीचे लोन सध्या ग्रामीण भागातही पसरत असून, तेथील तरुणांनाही या खरेदीचे आकर्षण आहे. शहरातील नातेवाइकांचे पत्ते देऊन या पत्त्यावर खरेदी साहित्य प्राप्त केले जात आहे. त्यामुळे तरुण- तरुणी, महिला देखील ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देत आहेत.

Online Shopping News
Nashik: संकटग्रस्त यादीतील ‘Greater Spotted’ गरुडाचे नांदूरमध्यमेश्‍वरमध्ये दर्शन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com