नियम मोडल्यामुळे इगतपुरी तालुक्यातील रेन फॉरेस्ट रिसॉर्ट सील

Rain Forest Resort at Igatpuri is sealed
Rain Forest Resort at Igatpuri is sealedSakal

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : तालुक्यातील बलायदुरी येथील रेन फॉरेस्ट रिसॉर्टचे मालक अवतारसिंग हरनाम शेट्टी यांनी विनापरवाना रेन फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये लोकांची गर्दी जमा केली. विवाहसोहळा आयोजित करून नियमांचे उल्लंघन केले. यापार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहा. घटना व्यवस्थापक तथा तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी रेन फॉरेस्ट रिसॉर्ट सीलबंद करण्याचा आदेश पारित केला. पोलिस निरीक्षक समाधान नागरे, मंडळ अधिकारी सुरेंद्र पालवे, तलाठी राम तौर, गोपनीय पोलिस राजेंद्र चौधरी, मुकेश महिरे, सचिन देसले, वैभव वाणी यांच्या पथकाने १० जूनपर्यंत हे रिसॉर्ट सीलबंद केले आहे. (Due to violation of rules The Rain Forest Resort at Igatpuri is sealed)

दरम्यान, २ जूनला रेन फॉरेस्ट रिसॉर्ट येथे घाटकोपर व गोरेगाव मुंबई येथील १० व्यक्ती यांनी जिल्हाबंदीच आदेश माहीत असतानाही पालन केले नाही. अत्यावश्यक काम नसताना व ई- पास न घेता त्यांनी हॉटेल रेन फॉरेस्ट रिसॉर्ट येथे येऊन वास्तव्य केले. यामुळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सचिन भांगजीभाई सावला, जगदीप मानसिभाई सतरा, सागर रामचंद्र सतरा, राजू खिमजी सतरा, शेफाली राजू सतरा, डिंपल जगदीप सतरा, त्रिशला सागर सतरा, मीना मनसुख सतरा, पायल सचिन सावला, मन्सूर विरम सतरा (सर्व रा. मुंबई) या पर्यटकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

रेनफॉरेस्ट रिसॉर्टचे मालक अवतारसिंग शेट्टी यांनी विनापरवाना रेन फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये लोकांची गर्दी जमा केली. शासनासह जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केले आहे. मागील वर्षांपासून विविध गुन्हे दाखल असूनही त्यांच्यात सुधारणा होत नाही. तसेच या प्रवाशांकडे जिल्हाबंदी असताना त्यांच्याकडे ई-पासदेखील नसल्याने गुन्हा दाखल केला आहे.

- समाधान नागरे, पोलिस निरिक्षक.

(Due to violation of rules The Rain Forest Resort at Igatpuri is sealed)

Rain Forest Resort at Igatpuri is sealed
नाशिक जिल्ह्यात यंदा ११ लाख रोपांच्या लागवडीचे नियोजन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com