नवदुर्गांच्या रूपातील चिमुकल्यांनी वेधले लक्ष.!

नवदुर्गांच्या रूपातील चिमुकल्यांनी वेधले लक्ष.!
Published on: 
YEO26B27257 येवला : विजयादशमीच्या निमित्ताने शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने शहरातून निघालेली दुर्गामाता महादौड. ----------------- नवदुर्गांच्या रूपातील चिमुकलींनी वेधले लक्ष येवल्यात दुर्गामाता महादौड, नऊ दिवसांच्या दौडची सांगता ------------- सकाळ वृत्तसेवा येवला, ता.२० : नवरात्रातील नऊ दिवस शक्तीची उपासना, हिंदू संस्कृतीचा जागर करत सुरू असलेल्या श्री दुर्गामाता दौडची विजयादशमीच्या मंगलपर्वावर उत्साहात सांगता झाली. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आयोजित श्री दुर्गामाता महादौडमध्ये नवदुर्गांचे नऊ अवतार साकारलेल्या चिमुकल्या मुलींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भगव्या उत्साहात आणि देवीच्या जयघोषात या महादौडमुळे शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. नवरात्रोत्सवातील घटस्थापनेपासून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत शहरातील विविध भागांत तसेच देवी मंदिरांमध्ये दररोज सकाळी श्री दुर्गामाता दौड काढण्यात येत होती. संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा आणि हिंदू संस्कृतीतील मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश देण्यात आला. विजयादशमीच्या दिवशी समारोपानिमित्त महादौड काढण्यात आली. सफेद कुर्ता, लाल फेटा घालून हातात मशाली घेतलेले तरुण तसेच देवीचे रूप आणि पारंपारिक साड्या व फेटा परिधान करून सहभागी झालेल्या दुर्गा हे या दौडचे वैशिष्ट्ये ठरले. काळा मारुती परिसरातील रेणुका माता मंदिरापासून महादौडला प्रारंभ झाला. प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करीत ही दौड शिवसृष्टी येथे पोहोचली. तेथे दुर्गामातेची महाआरती करून उपक्रमाची सांगता झाली. यात नगरसेवक समीर समदडिया, बंडू क्षीरसागर यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते. गेल्या नऊ वर्षांपासून येथे श्री दुर्गामाता दौडचे सातत्याने आयोजन करण्यात येत असल्याची माहिती आयोजक ज्ञानेश्वर लोहकरे यांनी दिली. नवरात्रीच्या नऊही दिवसांत शहरवासीय आणि हिंदू समाजबांधवांनी विविध भागांत दौडचे उत्स्फूर्त स्वागत केले. नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद आणि प्रेमामुळे उपक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. या महादौडला रक्षक आजी- माजी सैनिक संघटनेचा पाठिंबा मिळाला. धर्मरक्षणासाठी आजी- माजी सैनिक संघटना सदैव सक्षमपणे उभी राहील, असा विश्वास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुशील शिंदे यांनी व्यक्त केला. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com