धुळे टुडे २ साठी...ॲंकर
---
फोटो-NSK26H32359, NSK26H32360
धुळे : शिवशक्ती कॉलनीत विराजमान दुर्गा भवानीची मूर्ती. दुसऱ्या छायाचित्रात मिरवणूकीत नृत्य करतांना महिला.
---
शिवशक्ती कॉलनीत महिलाशक्तीचा जागर
---
दुर्गा भवानीचे मिरवणुकीतून आगमन; गरबा- दांडियासह विविध स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १४ : शहरातील मिल परिसरातील शिवशक्ती कॉलनीत शारदीय नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला. ढोल- ताशांचा निनाद, शिरावर भगवे फेटे, देवीचा जयघोष आणि महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने काढण्यात आलेल्या दुर्गा भवानीच्या आगमन मिरवणुकीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
आमदार अनुप अग्रवाल, श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानचे संस्थापक रवींद्र शेलार, नगरसेवक तथा भाजप पश्चिम मंडळ अध्यक्ष अमोल मासुळे आणि शिवशक्ती मित्र मंडळाच्या विशेष पुढाकाराने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. घटस्थापनेच्या दिवशी सायंकाळी आकर्षक रोषणाई व फुलांनी सजावट केलेल्या वाहनातून देवी भवानीची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शेकडो महिला, तरुणी, युवक आणि बालगोपाळ सहभागी झाले. पारंपरिक वेशभूषा, मस्तकी भगवे फेटे, फटाक्यांची आतषबाजी आणि भक्तिगीतांच्या तालावर महिलांना ठेका धरला. मिरवणूक मंडपात पोहोचल्यानंतर विधिपूर्वक घटस्थापना, देवीची पूजा आणि महाआरती झाली. त्यानंतर पारंपरिक गरबा- दांडियाला सुरुवात झाली.
विविध स्पर्धांचे आयोजन
या नवरात्रोत्सवात महिलांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी रांगोळी, पाककला, गरबा-दांडिया नृत्य, पारंपरिक वेशभूषा, संगीत खुर्ची आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवादरम्यान महिलांच्या सुरक्षिततेसाठी आयोजकांकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. धार्मिक परंपरांचे जतन, समाजात सलोखा व एकोपा वाढवणे आणि महिलांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करणे हा या उत्सवाचा मुख्य उद्देश आहे. या संपूर्ण नियोजनात परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला भाविक, श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान आणि शिवशक्ती मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांचे योगदान लाभले आहे. या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी मीना पवार, प्रिया ब्राह्मणकर, हर्षदा तलवारे, स्वाती ब्राह्मणकर, अमोल जोशी, नरेंद्र येवले, गौरव सोनवणे, अभिजीत मोगलाईकर, अथर्व जोशी, कुबेर भंडारी, प्रवीण पाटील, अंकित पाटील, प्रफुल्ल पाटील, ऋषिकेश शिंदे, हेमंत देसले यांच्यासह इतर कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
---