दुर्गापूजा महोत्सवाची दिमाखदार सांगता...

दुर्गापूजा महोत्सवाची दिमाखदार सांगता...
Published on: 
फोटो : B05030 गांधीनगर : दुर्गापूजा महोत्सवात भाविकांची झालेली गर्दी. -- दुर्गापूजा महोत्सवाची उत्साहात सांगता सकाळ वृत्तसेवा डीजीपीनगर, ता. २१ : बंगाली बांधवांतर्फे आणि गांधीनगर सार्वजनिक समिती आयोजित ७३ व्या दुर्गापूजा महोत्सवाची विजयादशमीला मोठ्या उत्साहात सांगता झाली. महोत्सवातून बंगाली परंपरा आणि संस्कृतीचे सुंदर दर्शन घडले. महोत्सवांतर्गत षष्ठीला बेलाच्या झाडाजवळ पूजा करण्यात आली, तर सप्तमीपासून देवीच्या मुख्य पूजेला सुरुवात झाली. यादरम्यान देवीला खीर, पुलाव, विविध भाज्या, चटणी आणि फळांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. महाअष्टमीला विशेष पूजा आणि संधी पूजेला विशेष महत्त्व असते. या दिवशी १०८ बेलपत्रे व १०८ जास्वंदांच्या फुलांची माळ देवीला अर्पण करून सार्वजनिक समितीचे अध्यक्ष सुजॉय गुप्ता यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. या वेळी स्वामी सविधानंद सरस्वती यांची विशेष उपस्थिती होती. महादशमीला पूजा, पुष्पांजली, दर्पण विसर्जन आणि अपराजिता पूजा विधी पार पडले. सायंकाळी झालेल्या सिंदूर महोत्सवात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत देवीच्या चरणी सिंदूर अर्पण केला व मिठाईचा नैवेद्य दाखविला. त्यानंतर देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले आणि विजया रॅली काढण्यात आली. दरम्यान, सायंकाळच्या सत्रात झालेली संगीत मैफिल, प्रेक्षकांचे डोळे दिपावणारे नृत्यआविष्कार आणि चोखंदळ खवय्यांसाठी पदार्थांचे स्टॉल्स यांमुळे महोत्सवाची रंगत वाढली. या विविध स्टॉलवर खाद्यप्रेमींनी हजारोच्या संख्येने गर्दी केली होती. दसऱ्याच्या या पवित्र दिवशी हजारो भाविकांनी दुर्गा मातेची यथासांग पूजा-अर्चा करून दर्शन घेतले आणि महोत्सवाचा आनंद घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com