दसऱ्यानिमित्त जळगावचा बाजार फुलला

दसऱ्यानिमित्त जळगावचा बाजार फुलला
Published on: 
सेकंड मेन --- NSK26H32986 (हा फोटो चार कॉलम वापरावा) जळगाव : दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी झालेली गर्दी. ---- NSK26H32984 (हा फोटो दोन कॉलम वापरावा) विक्रीला आलेली झेंडूची फुले. ----------- दसऱ्याच्‍या पूर्वसंध्येला फुलली बाजारपेठ (उपशीर्षक) खरेदीसाठी नागरिकांची गर्दी; झेंडूच्‍या फुलांची मोठी आवक सकाळ वृत्‍तसेवा जळगाव, ता. १९ : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सणाच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी बाजारात गर्दी पाहावयास मिळाली. यंदा झेंडूच्या फुलांची आवक मोठ्या प्रमाणात आहे. फुलांसह मिठाई आणि वाहनांच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होती. दुकाने आणि रस्त्यांवरील स्टॉलवर खरेदीसाठी लगबग सुरू आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्‍या दसरा उद्या (ता.२०) साजरा केला जाणार आहे. या पार्श्र्वभूमीवर घरोघरी तयारी सुरू आहे. महिला वर्गाची देखील लगबग पाहावयास मिळत आहे. दरम्‍यान, मुहूर्तावर घरात वस्‍तू खरेदी केली जात असल्‍याने आजचे खरेदीसाठी गर्दी होती. प्रामुख्‍याने इलेक्‍ट्राॅनिक्‍स मार्केटमध्‍ये टीव्‍ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदी केले जात होते. त्‍याचप्रमाणे वाहनांच्‍या शोरूममध्‍ये देखील बुकिंगसाठी गर्दी होती. विविध वस्‍तूंची खरेदी सणानिमित्त मिठाईची दुकाने, कपड्यांची दुकाने आणि इतर बाजारपेठांमध्येही ग्राहकांची गर्दी दिसून आली. दसऱ्याच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे, वाहन पूजन आणि सोने खरेदीला महत्त्व असल्याने नागरिकांकडून विविध वस्तूंची खरेदी केली जात आहे. चौकट झेंडूच्‍या फुलांचे ढीग दसऱ्याला घर, दुकान आणि वाहनांच्या पूजनासाठी झेंडूच्या फुलांचे हार तसेच तोरणांना विशेष महत्त्व असते. त्यामुळे फुलविक्रेत्यांनी विविध आकारांचे हार आणि तोरणे विक्रीसाठी तयार करून ठेवली आहेत. तसेच रस्‍त्‍यांवर झेंडूच्‍या फुलांचे मोठे ढीग लागले आहेत. झेंडूंची फुले आज (ता.१९) ५० ते ६० रुपये किलोने विक्रीसाठी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com