धुळे : टुडे पान २ साठी.. अवतीभवती
--
धुळ्यात धनदाई नगरात
रावणदहन सोहळा
धुळे : दसऱ्याच्या मुहूर्तावर देवपूरमधील धनदाई नगर येथील मोकळ्या मैदानात धनदाई नगर सांस्कृतिक व अध्यात्मिक मित्रमंडळातर्फे प्रभू श्रीरामांच्या जयघोषात रावणदहन सोहळा उत्साहात पार पडला. स्पंदन पाटील याने श्रीराम, प्रणय सोनवणे याने लक्ष्मण आणि श्रेयस वाणी यांनी हनुमान भूमिका साकारलेल्या प्रतीकात्मक वेशभूषा विशेष आकर्षण ठरल्या. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनात आणि युवकांच्या सहभागातून पार पडलेल्या या कार्यक्रमाने सामाजिक एकोपा व बंधुभाव जपण्याचा संदेश दिला. भाजपचे पदाधिकारी रणजितराजे भोसले, प्राचार्य डॉ. प्रविणसिंग गिरासे, भैयासाहेब पाटील, सोमनाथ अहिरे, शांताराम अहिरे, संभाजी देसले, बापू बोरसे, गोरख पाटील, राजेंद्र पाटील, डॉ. सुरेंद्रसिंग राजपूत, भटू भावसार, राजेंद्र बिलारीस, सतीश शिंपी उपस्थित होते. रवींद्र अहिरराव, निखिल चौधरी, नितीन अहिरे, हंसराज महाजन, गुणवंत मोरे, डॉ. संदीप पाटील, दीपक महाले, स्वप्नील पाटील, प्रा. महेश बिलारीस, प्रा. महेश पाटील, प्रा. डॉ. इंद्रजित गिरासे, सुमित भावसार, उमेश भदाने, शुभम ठाकरे, योगेश ठाकूर, सचिन वाघ, दत्तू माळी आणि शशिकांत महाजन यांनी संयोजन केले.
--
निकम इन्स्टिट्यूटमध्ये
वाचनप्रेरणा दिन साजरा
धुळे : येथील निकम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट स्टडीजमध्ये भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा झाला. डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रारंभ झाला. माहितीशास्त्र विभागाचे मार्गदर्शक डॉ. प्रवीण बोरसे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष रोहित रवींद्र निकम यांनी विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनातून ज्ञानात सतत भर घालण्याचे आवाहन केले. संस्थापक अध्यक्ष प्रा. रवींद्र निकम, सचिव प्रा. शुभांगी निकम, सदस्य डॉ. आदित्य निकम, प्राचार्य प्रा. डॉ. सुनील देसले, प्रा. डॉ. रवीकुमार पाटील, प्रा. अनंत वाघ, प्रा. नितीश बडगुजर यांच्यासह सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.