धुळे रावण दहन

धुळे रावण दहन
Published on: 
धुळे ः टुडे २ साठी -- सूचना ः विद्यार्थिनी मृत्यूचा निष्पक्ष तपास व्हावा......ही बातमी शिल्लक ठेऊन या बातमीऐवजी ही रावण दहनाची बातमी घ्यावी..... -- फोटो क्रमांक ः 32833...सुशील पोपली -- फोटो क्रमांक ः 32834...ललित आरूजा -- धुळ्यात ५१ फुटी रावणाचे दहन - विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या मैदानावर सोहळा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १७ : विजयाचे प्रतीक असलेल्या विजयादशमीनिमित्त (दसरा) येथील छत्रपती संभाजीनगर (मोगलाई) व साक्री रोड परिसर रावण दहन समितीतर्फे रविवारी (ता. २०) रात्री आठला विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या मैदानावर रावण दहनाचा कार्यक्रम होणार आहे. यात रावणाची ५१ फुटी प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात येईल. उद्योजक तथा हॉटेल कृष्णाईचे संचालक सुशील पोपली अध्यक्षस्थानी असतील. महापौर मायादेवी परदेशी, आमदार अनुप अग्रवाल, जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस प्रमुख पाहुणे असतील. नगरसेवकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती असेल. या पार्श्‍वभूमीवर उद्योजक राहुल अग्रवाल आणि पीयुष कन्स्ट्रक्शनचे संचालक संजय देसले यांच्या मार्गदर्शनात समितीने कार्यकारीणी जाहीर केली. ती अशी : अध्यक्ष- सुशील पोपली, कार्याध्यक्ष- ललित अरुजा, सहकार्याध्यक्ष- ॲड. अश्‍वघोष हातेकर, उपाध्यक्ष- अनिल पाटील, दिनेश पोतदार, सचिव- विश्वनाथ खरात, सहसचिव- किशोर रेलन, खजिनदार- राकेश कुलेवार, सहखजिनदार- प्रकाश पोळ, सूत्रसंचालक- जगदीश भगत, सदस्य- सुरेश कुंदनानी, निनाद पाटील, चिकू मन्सुरी, रमेश दुसेजा, मुख्य आयोजक- मनपा स्थायी समिती सभापती लताबाई पोतदार, गटनेत्या किरण कुलेवार, नगरसेविका प्रतिभा पाटील, नगरसेवक ललित अरुजा, नगरसेविका पूनम शिरसाट, नगरसेवक प्रदीप बैरागी. नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रावण दहन समितीने केले आहे. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com