धुळे ४२ कोटी उलाढाल

धुळे ४२ कोटी उलाढाल
Published on: 
धुळे ः टुडे १ साठी, मेन -- जिल्ह्यात ४२ कोटी रूपयांची उलाढाल शक्य! -- विजयादशमीच्या मुहूर्तावर खरेदीची लगबग; ९०० वाहनांचीही विक्री शक्य सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १९ : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या मुहूर्तावर खरेदीसाठी धुळेकर सज्ज झाले आहेत. जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असले, तरी दसऱ्यानिमित्त मंगळवारी (ता. २०) बाजारपेठेत चांगल्या उलाढालीची अपेक्षा व्यावसायिकांना आहे. वाहन खरेदी, बांधकाम आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात मिळून सुमारे ४२ कोटी ५० लाख रूपयांची उलाढाल होण्याचा अंदाज व्यावसायिकांना आहे. मात्र, आर्थिक अनिश्चिततेमुळे ग्राहकांच्या खरेदीवर कितपत परिणाम होतो, याकडे व्यापारी वर्गाचे लक्ष लागले आहे. - दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन वाहन खरेदीला विशेष पसंती दिली जाते. यंदाही दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे आगाऊ आरक्षण (बुकिंग) मोठ्या प्रमाणावर झाले आहे. दसऱ्याच्या दिवशी सुमारे ९०० नवीन वाहने रस्त्यावर येण्याची अपेक्षा बाजारपेठेत व्यक्त होत आहे. दुचाकींच्या बाजारात इलेक्ट्रिक वाहनांनाही (ईव्ही) चांगला प्रतिसाद मिळत आहे. - बांधकाम क्षेत्रात वाहन खरेदीसोबतच धुळे शहरात सुमारे १०० घरांचे आरक्षण आणि गृहप्रवेशाचे नियोजन आहे. दसऱ्यानिमित्त विविध क्षेत्रातून अपेक्षित असलेल्या उलाढालीत बांधकाम क्षेत्राचा वाटा मोठा आहे. या क्षेत्रातून सुमारे २० कोटी रुपये, चारचाकी वाहनांच्या विक्रीतून १५ कोटी रुपये, दुचाकींच्या विक्रीतून ७ कोटी रुपये आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीतून ५० लाख रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. नवरात्रोत्सवापासूनच बाजारपेठेत खरेदीला सुरुवात झाली असून, दसऱ्याच्या मुहूर्तावर त्यात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. - खरेदीवर मर्यादा शक्य पावसाने यंदा अपेक्षित साथ न दिल्याने शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसमोर आर्थिक आव्हाने उभी ठाकली आहेत. शेतीच्या उत्पन्नाबाबत अनिश्चितता असल्याने मोठ्या खरेदीचे निर्णय घेताना बऱ्याच ग्राहकांकडून आर्थिक स्थितीचा विचार केला जाण्याची शक्यता आहे. गतवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन, इलेक्ट्रॉनिक्स आणि बांधकाम क्षेत्रात सुमारे ३० ते ३५ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. यंदा ती ४२ कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे. मात्र, प्रत्यक्ष विक्री आणि ग्राहकांची क्रयशक्ती यावरच अंतिम उलाढाल अवलंबून राहणार आहे, असे ज्येष्ठ व्यावसायिकांनी सांगितले. - १४-१ ...चौकट... १४-१ परंपरेनुसार विजयादशमी अधर्मावर धर्माचा, असत्यावर सत्याचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शविणाऱ्या विजयादशमीच्या स्वागतासाठी धुळेकर सज्ज झाले आहेत. मंगळवारी (ता. २०) दसऱ्यानिमित्त शहरात उत्साही वातावरण राहणार असून शमीपूजन, शस्त्रपूजन, वाहनपूजन आणि सीमोल्लंघनासह आपट्याची पाने एकमेकांना देऊन ‘सोने घ्या, सोन्यासारखे राहा’ म्हणत शुभेच्छा देण्याची परंपरा जपली जाईल. एका बाजूला सणाचा उत्साह आणि दुसरीकडे दुष्काळामुळे निर्माण झालेली आर्थिक चिंता, अशा संमिश्र वातावरणात यंदाचा दसरा धुळे शहराच्या बाजारपेठेसाठी किती लाभदायी ठरतो, हे उद्याच स्पष्ट होईल. दसऱ्यानंतर दिवाळीच्या खरेदीतून बाजारपेठेतील आर्थिक स्थितीचे चित्र अधिक स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com