दसऱ्याला जळगावच्या बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल सोने-चांदी, कपडे आणि वाहनांच्या खरेदीला पसंती; व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

दसऱ्याला जळगावच्या बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल
सोने-चांदी, कपडे आणि वाहनांच्या खरेदीला पसंती; व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
Published on: 
मेन फिचर NSK26H33126 जळगाव : ऑटोमोबाईल्स शोरुममध्ये गाडी खरेदी करताना युवक. --------- दसऱ्याला ‘ई-बाइक’ला पसंती, वाहन खरेदी तेजीत जळगावात कोट्यवधींची उलाढाल; नवीन वास्तू, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कपडे खरेदीचा उत्साह सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२० : विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या मुहूर्तावर शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या दसऱ्याच्या शुभदिनी सोने-चांदी, नवीन कपडे, दुचाकी आणि चारचाकी, विशेषत: ई-बाइक खरेदीला नागरिकांनी विशेष पसंती दिली. सणाच्या पार्श्वभूमीवर विविध वस्तूंच्या खरेदी-विक्रीत वाढ झाल्याने शहरातील बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विविध क्षेत्रांतील खरेदीमुळे बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचे चित्र होते. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बाजारपेठेत सोने-चांदीपासून वाहनांपर्यंत विविध वस्तूंची खरेदी झाली. सणाचा उत्साह, शुभमुहूर्ताची परंपरा आणि आगामी दिवाळीची चाहूल यामुळे शहरातील व्यापाराला चांगली चालना मिळाल्याचे चित्र दिसून आले. सोन्या-चांदीला झळाळी दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणे शुभ मानले जात असल्याने सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी झाली. सोन्याचे दागिने, नाणी तसेच चांदीच्या वस्तू खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल होता. कपड्यांची खरेदी दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कापड बाजारातही चांगली लगबग दिसून आली. महिला, पुरुष आणि लहान मुलांसाठी विविध प्रकारचे कपडे खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी दुकानांमध्ये गर्दी केली होती. साड्या, ड्रेस मटेरियल, कुर्ते, शर्ट-पँट, लहान मुलांचे कपडे तसेच सणासुदीच्या पोशाखांना पसंती मिळाली. वाहन खरेदी सुसाट दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन वाहन खरेदी करण्याची परंपरा अनेक कुटुंबांमध्ये आहे. त्यामुळे शहरातील दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी झाली. नवीन दुचाकी, मोटारी तसेच कुटुंबाच्या गरजेनुसार वाहन खरेदी करण्यासाठी नागरिकांनी चौकशी केली होती. काही ग्राहकांनी यापूर्वीच वाहनांची नोंदणी करून दसऱ्याच्या दिवशी वाहन घरी नेण्याचे नियोजन केले होते. दिवाळीच्या खरेदीची अपेक्षा सणासुदीच्या काळात बाजारपेठेत होणारी गर्दी व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाची असते. दसऱ्याच्या निमित्ताने झालेल्या खरेदीमुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण होते. विविध क्षेत्रांतील खरेदी-विक्रीमुळे आर्थिक उलाढालीला चालना मिळाली. दसऱ्यानंतर आता दिवाळीच्या खरेदीकडे व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे. चौकट इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंनाही मागणी सोने-चांदी, कपडे आणि वाहनांबरोबरच इलेक्ट्रॉनिक्स व गृहपयोगी वस्तूंच्या खरेदीलाही नागरिकांनी पसंती दिली. मोबाइल, दूरचित्रवाणी संच, फ्रीज, वॉशिंग मशीन तसेच घरासाठी आवश्यक असलेल्या विविध वस्तूंची खरेदी करण्यात आली. कोट दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणे शुभ मानले जात असल्याने ग्राहकांकडून दागिने, सोन्याची नाणी आणि चांदीच्या वस्तूंना मागणी असते. सोन्याच्या दरात चढ-उतार असले, तरी सणाच्या मुहूर्तावर खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येतो. लग्नसराई आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवरही ग्राहकांकडून चौकशी वाढली आहे. - राजेश वडनेरकर, सराफा व्यावसायिक कोट दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवीन कपडे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची चांगली गर्दी होत आहे. महिला, पुरुष आणि लहान मुलांच्या कपड्यांना मागणी असून, पारंपरिक पोशाखांसोबतच आधुनिक डिझाइन्सनाही ग्राहक पसंती देत आहेत. दसऱ्यानंतर दिवाळीच्या खरेदीत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. - किशोर सोनी, कापड व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com