दसऱ्यानिमित्ताने एक हजार कुटुंबीयांना साखर वाटप

दसऱ्यानिमित्ताने एक हजार कुटुंबीयांना साखर वाटप
Published on: 
फोटो : A15056 नाशिक : दसऱ्यानिमित्त गोरगरिबांना वाटप करण्यात आलेली साखर -- दसऱ्यानिमित्त एक हजार गोरगरिबांना साखरवाटप सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक, ता. २१ : दसरा मेळाव्यानिमित्ताने गंजमाळ परिसरातील एक हजार गोरगरीब कुटुंबीयांना प्रत्येकी एक किलो साखरेचे वाटप करण्यात आले. दसऱ्यानिमित्त शिवसेनेतर्फे दसरा मेळाव्याचे मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते. राज्यात सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती असल्याने पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मेळाव्यास उपस्थित न राहता स्थानिक स्तरावर समाजउपयोगी कामे करावीत. असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले होते. त्यानिमित्ताने शिवसेना पदाधिकारी दीपक डोके यांच्याकडून गंजमाळ परिसरात मंगळवारी (ता. २०) गोरगरीब एक हजार कुटुंबीयांना प्रत्येकी एक किलो साखर वाटप करून त्यांचा दसरा गोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवसेना उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या हस्ते गोरगरीब कुटुंबीयांना साखर वाटप उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. दरम्यान सरकारच्या विविध शासकीय योजना बद्दल माहिती दिली. योजनांचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा. असे आवाहन करण्यात आले. एलईडी स्क्रीनवर दसरा मेळाव्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. या वेळी उत्तम जाधव, बंटी गांगुर्डे, परवीन शेख, विकी म्हस्के, सिद्धार्थ आव्हाड, सुशांत गालफाडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com