द्वारका परिसरातील बेला पेट्रोल पंपसमोरील शहर बस निवारा शेड सध्या अत्यंत जर्जर अवस्थेत आहे. पंधरा वर्षांपासून या निवारा शेडची कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. या शेडच्या शेजारीच झोपडपट्टी असल्याने अनेकदा प्रवाशांना संभ्रम पडतो, की हे बसथांब्याचे निवारा शेड आहे की झोपडपट्टीतील घर. त्यामुळे अनेक प्रवासी निवारा शेडऐवजी थेट रस्त्यावर उभे राहणे पसंत करतात.