OLN26A15186
द्वारका चौक ः शनिवारी (ता.७) रात्री येथील चौकात झालेल्या अपघातातील बसखालून मृतदेह काढताना नागरिक.
-------------------
३६-२
उपनगर येथी महिलेचा
बसखाली सापडून मृत्यू
------------
द्वारका चौकातील सायंकाळची घटना
-----------
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक, ता. ७ ः द्वारका चौकात पादचारी महिलेचा एसटी महामंडळाच्या बसखाली सापडून मृत्यू झाला. शनिवारी (ता.७) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. रेखा अरविंद जाधव (रा. उपनगर) असे महिलेचे नाव आहे. मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
---------------
राज्य परिवहन महामंडळाची बस (एमएच १४, एनई ४७२४) मालेगावकडून नाशिकच्या दिशेने येत होती. द्वारका चौकात पायी जात असलेल्या रेखा जाधव यांना बसची जोरदार धडक बसली. त्याचा पदर अडकल्याने त्या पुढील चाकाखाली सापडून फरफटत गेल्या. बस त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती प्रत्यक्षदर्शिंनी दिली. अपघात इतका भीषण होता, की अक्षरशः महिलेच्या शरिराचे दोन तुकडे झाले. छिन्नविछिन्न झालेला मृतदेह मुंबई नाका पोलिसांनी परिसरातील रिक्षा चालकांच्या मदतीने बसखालून काढला. घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका आणि भद्रकाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. अपघात घडताच बसचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक पोपट माळोदे यांनी वडाळा नाका चौकातून चालकास ताब्यात घेत मुंबई नाका पोलिसांच्या स्वाधीन केले.
द्वारका चौकात रस्त्याच्या मधोमध अपघात घडल्याने नेमका गुन्हा कोण दाखल करणार यावर मुंबई नाका आणि भद्रकाली पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांमध्ये काही वेळ चर्चा झाली. त्यानंतर मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतच अपघात झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्याकडे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान या अपघाताने जाधव कुटुंबीयांवर शोककळा पसरली. लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला अपघातात रेखा जाधव यांचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली.
...............
१६-१
एका डायरीने पटली ओळख
रेखा जाधव यांच्याकडे एक पिशवी आणि एक पाकिट मिळून आले. पिशवीत लिंबू टाचण्या अशा काही संशयास्पद वस्तू होत्या तर पाकिटात काही रक्कम आणि एक डायरी मिळून आली. मुंबई नाका पोलिसांनी बराच वेळ डायरीतील प्रत्येक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी महिलेस ओळखत नसल्याचे सांगितले. शेवटी एक क्रमांक मिळाला आणि जाधव कुटुंबीयांचा संपर्क झाला. त्या येवला येथील न्यायालयात केस संदर्भात गेल्या होत्या अशी माहिती देण्यात आली. त्यावरून महिलेची ओळख पटण्यास मदत झाली.
--------