जुने नाशिक- द्वारका चौकात रुग्णवाहिका १०८ मधील महिला डॉक्टरला मारहाण करत शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला. त्यामुळे परिसरात तसेच भद्रकाली पोलिस ठाणे आवारात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण १०८ रुग्णवाहिका चालकांनी काही वेळ बंद पुकारला. पीडित महिला डॉक्टरची समजूत काढल्यानंतर रुग्णवाहिका पुन्हा सुरू करण्यात आल्या.