द्वारका चौकातील अतिक्रमण हटविणार

द्वारका चौकातील अतिक्रमण हटविणार
Published on: 
मेनला क्लब करणे --------- द्वारका चौकातील अतिक्रमण हटविणार ६० दुकानदारांना नोटिसा, २१ ते २३ ऑक्टोबरला सुनावणी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १२ : द्वारका चौकातील महापालिकेच्या मालकीच्या सुमारे चार एकर जागेवरील अतिक्रमणे हटविली जाणार आहे. महापालिका प्रशासनाने ६० व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या असून, त्यांना बाजू मांडण्यासाठी २१ ते २३ ऑक्टोबरदरम्यान सुनावणीची संधी देण्यात आली आहे. द्वारका येथील सर्वे नंबर ४८९ मधील फायनल प्लॉट क्रमांक २८२ ही सुमारे चार एकर जागा महापालिकेच्या मालकीची आहे. १९७३ पासून द्वारका चौकातील जागा भाडेतत्त्वावर दिली होती. सध्या तेथे १०९ दुकानदार व्यवसाय करतात. रस्ता रुंदीकरणात अडथळा होत असल्याने महापालिकेने २०१५ मध्ये पहिल्यांदा नोटिसा दिल्या. त्यानंतर २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन अतिक्रमण उपायुक्तांनी सर्व दुकाने अनधिकृत ठरवत १५ दिवसांत जागा मोकळी करण्याचे आदेश दिले. या विरोधात व्यावसायिकांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने ५ जानेवारी २०२३ रोजी महापालिकेच्या बाजूने निकाल दिला. निकालाविरोधात ४० दुकानदारांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. महापालिकेने अतिक्रमण काढण्यापूर्वी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने व्यावसायिकांच्या बाजूने निर्णय दिला. त्यानंतर महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात अपील केले. सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेचा ताबा कायम ठेवत, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जागा खाली करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पूर्व विभागीय कार्यालयाकडून आता ६० व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या. या व्यावसायिकांना २१ ते २३ ऑक्टोबरदरम्यान सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. सुनावणीत त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहेत अशी माहिती अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे यांनी दिली. ------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com