जुने नाशिक- रिक्षा, टॅक्सी आणि ट्रॅव्हल्स बसमुळे द्वारका चौकात वाहतूक कोंडीत भर पडत आहे, अशी खंत लोकप्रतिनिधींकडून व्यक्त करण्यात आली. त्यानिमित्ताने सोमवारी (ता. १६) वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी अधिकाऱ्यांसह चौकाची पाहणी केली. रिक्षा, टॅक्सी आणि ट्रॅव्हल्सचालकांशी चर्चा करत त्यांचे थांबे इतरत्र स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या.