Crime News : नाशिकमध्ये वाहतूक पोलिसांची मोठी कामगिरी: रक्ताने माखलेला चाकू घेऊन फिरणाऱ्या हल्लेखोराला पकडले
Traffic Police Apprehend Knife Attack Suspect in Dwarka Circle : नाशिकमधील द्वारका चौकात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी हातात रक्ताने माखलेला चाकू घेऊन फिरणाऱ्या कुणाल अहिरे या प्राणघातक हल्ल्यातील संशयिताला चाकूसह ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला सातपूर पोलिसांच्या स्वाधीन केले असून, जखमी मित्रावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत
जुने नाशिक: द्वारका चौकात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी प्राणघातक हल्ल्यातील संशयित यास चाकूसह ताब्यात घेतले. प्राणघातक हल्ला करून फिरत असलेला संशयितास ताब्यात घेत सातपूर पोलिसांच्या स्वाधीन केले.