जुने नाशिक- शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या द्वारका चौकातील वाहतूक कोंडीची समस्या अद्याप सुटलेली नाही. कोंडी कमी करण्यासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेत सर्कल हटविले, चौकातील अतिक्रमण हटविण्याची सलग चार दिवस मोहीम राबविली, मात्र प्रत्यक्षात वाहतूक कोंडी ‘जैसे थे’ आहे. नागरिकांसह वाहनचालकांना जीव मुठीत धरून चौकातून मार्ग काढावा लागत आहे.