जुने नाशिक- रुग्णांच्या तातडीच्या सेवेसाठी वापरली जाणारी रुग्णवाहिका ही एक महत्त्वाची सेवा आहे. मात्र द्वारका परिसरात या रुग्णवाहिकांचा प्रवासी वाहतुकीसाठी सर्रास वापर होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. उड्डाणपुलावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर, द्वारका रॅमवर दोन रुग्णवाहिका थांबून प्रवासी बसवतानाचे दृश्य निदर्शनास आले. या प्रकारामुळे नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.