मालेगाव- कमी खर्चात धावणाऱ्या ई-बाईककडे ‘कसमादे’तील नागरिकांचा दिवसेंदिवस कल वाढला. गेल्या दोन वर्षांत पाच हजार ३०० या ई-वाहनांची विक्री झाली आहे..दुचाकी, चारचाकी, मालवाहतूक, ॲपेरिक्षा यासह विविध प्रकारच्या ई-बाईक बाजारात आहेत. या दुचाकीला खर्च कमी व पैसा वसुल तसेच प्रदूषणमुक्त असल्याने नागरिकांचा ओढा या वाहनांकडे वाढला आहे. सन २०२३ मध्ये ई-बाईक एक हजार ३५२ तर २०२४ मध्ये तीन हजार ८५८ तर जानेवारी २०२५ मध्ये ४२३ ई दुचाकी विक्री झाल्या आहेत..सुरवातीला इलेक्ट्रीक वाहनासंदर्भात नागरिकांमध्ये गैरसमज होता. या वाहनांना बॅटरीशिवाय दुसरा खर्च नसल्याने कमी खर्चात जास्त काळ टिकल्याने नागरिकांचा ओढा ढला आहे. ग्रामीण भागातील अनेक शाळकरी मुले या वाहनावरच शाळेत ये-जा करतात. त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास काही प्रमाणात मदत होत आहे. .शहरात भंगारात आलेली ई-वाहने दुरुस्तीचा फंडा आहे. त्यामुळे शहरात अनेक नागरिक स्थानिक व्यावसायिकांनी दुरुस्त केलेल्या व कमी किमतीत दुचाकी खरेदी करतात. या वाहनाला कसमादेत देखील अनेक शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. मालेगावला २० हजार ते दीड लाखापर्यंत ई-बाईक मिळतात. शाळकरी मुले, महिला, शेतकरी व सर्वसामान्य नागरिक वापरातांना दिसत आहेत. कमी खर्चात यातील काही वाहने ५० ते १०० किलोमीटर पर्यंत धावतात..ग्रामीण भागात ई-बाईक घेण्याकडे अनेक नागरिकांचा कल आहे. दहा वाहनांमागे दोन-तीन ई-बाईक धावताना दिसतात. खर्च कमी, जास्त काळ टिकणारी असल्याने अनेक नागरिक ही वाहने खरेदी करतात. - विनोद जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मालेगाव.सायकलला फाटाबाजारात ई-वाहने आल्यापासून येथील सायकल वापरण्याचे प्रमाण घटले आहे. शहरात चार ते पाच ठिकाणी जुन्या ई-बाईक दहा ते पंधरा हजार रुपयांत मिळतात. त्यामुळे सायकल चालविण्याचे प्रमाण घसरून अनेक नागरिक येथे जुन्या ई-बाईक घेत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.