Nashik News: ऑनलाईन औषध विक्रीवर लवकरच निर्बंध : मंत्री धर्मारावबाबा आत्राम

डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय ऑनलाईन औषधांची सुरू असलेल्या विक्रीविरोधात अनेक तक्रारी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे आलेल्या आहेत.
Early restrictions on online drug sales Minister Dharmarao Baba Atram.
Early restrictions on online drug sales Minister Dharmarao Baba Atram.esakal

नाशिक : डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय ऑनलाईन औषधांची सुरू असलेल्या विक्रीविरोधात अनेक तक्रारी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे आलेल्या आहेत.

या तक्रारींनुसार लवकरच अशा ऑनलाईन विक्री करण्यावर निर्बंध आणण्यासाठी शासन विचाराधीन असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांनी सांगितले. (Early restrictions on online drug sales Minister Dharmarao Baba Atram Strict action ordered against sale of Gutkha Nashik News)

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. मंत्री आत्राम म्हणाले, राज्यातील सात विभागांमध्ये आढावा बैठका घेण्यात आल्या आहेत.

त्यावेळी ऑनलाईन औषध विक्रीसंदर्भात तक्रारींचे निवेदन आले आहेत. मूळात औषध घेण्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन असणे बंधनकारक आहे. असे असतानाही ऑनलाईन औषधांची विक्री होते.

त्यातही अत्यंत स्वस्त दरामध्ये औषध उपलब्ध होत असल्याने त्यातून फसवणुकीची शक्यता अधिक आहे. त्यामुळे यासंदर्भात लवकर निर्बंध आणण्यासाठी शासन विचाराधीन असून लवकर निर्णय घेतला जाईल असे सांगितले.

त्याचप्रमाणे, राज्यात गुटखा बंदी आदेश लागू असतानाही परराज्यातून गुटखा आणला जातो. याबाबत विभागातील अधिकाऱ्यांना पोलिसांच्या मदतीने संयुक्तरित्या मोहीम राबवून गुटखाबंदी आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.

गुटख्यासंदर्भात एकावर तीन व त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले असतील तर त्यांच्यावर मोकाअन्वये कारवाई केली जाणार असल्याचे सांगत, आत्तापर्यंत राज्यात ६० ते ७० कोटींचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आल्याचे मंत्री आत्राम यांनी यावेळी सांगितले.

लवकरच भरती

अन्न व औषध प्रशासन विभागात मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला आहे.

त्यानुसार लवकरच ५०० पदाची भरती केली जाणार आहे. यामुळे विभागातील मनुष्यबळाची टंचाई दूर होऊन कामगिरीवरही चांगला परिणाम दिसून येईल असा विश्वास मंत्री आत्राम यांनी व्यक्त केला.

Early restrictions on online drug sales Minister Dharmarao Baba Atram.
Dharmarao Baba Atram News: कोण जितेंद्र आव्हाड, मी नाही ओळखत : मंत्री आत्राम

प्रत्येक विभागात प्रयोगशाळा

भेसळयुक्त मिठाई, अन्न व बनावट औषधी ड्रग्ज यांची तपासणी करण्यासाठी राज्यात फक्त तीन प्रयोगशाळा आहेत. मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथे या प्रयोगशाळा असून, राज्यभरातून नमुने याठिकाणी तपासणीसाठी पाठविले जातात. त्यांचे अहवाल येण्यास विलंब होतो.

त्यासाठी राज्यभरातील सातही विभागात प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २५ कोटी रुपयांचे अनुदान दिले असल्याचे मंत्री आत्राम यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे, लॅब ऑन व्हिल ही मिनी प्रयोगशाळा असलेली व्हॅनही प्रत्येक विभागामध्ये उपलब्ध होणार असून, त्यामुळे जागेवर भेसळयुक्त पदार्थांची तपासणी करणे सोपे जाणार असल्याचेही मंत्री आत्राम म्हणाले.

‘कुत्ता’ गोळीची पाळेमुळे खोदणार

मालेगावातून राज्यभर विक्री होणारी कुत्ता गोळीबाबत विक्रेत्यावर कारवाई होते. मात्र त्याचे उत्पादन करणारी टोळी मोकाट राहते.

यापुढे अन्न व औषध प्रशासन विभाग पोलिसांच्या मदतीने कुत्ता गोळीचे रॅकेट उघड करून या तस्करीच्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन कठोरपणे कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे मंत्री आत्राम यांनी सांगितले. 

Early restrictions on online drug sales Minister Dharmarao Baba Atram.
Nashik News : बालगृहे करतात अनाथ मुलांना सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम : आदिती तटकरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com