Success Story: जिद्द, मेहनतीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी! वडिलांचा व्यवसाय सांभाळून किरणने MPSCमध्ये मिळवले यश

Kiran Prajapat celebrating success with family
Kiran Prajapat celebrating success with familyesakal

Success Story : स्वप्न पाहा आणि ती सत्यात उतरवण्यासाठी जीवतोड मेहनत केल्यास यश आपल्याकडे आपोआप चालत येते, हे तत्त्व डोळ्यासमोर ठेवत देवळा (जि. नाशिक) येथील केटरर्स व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील किरण गोवर्धन प्रजापत हिने स्वतःला सिद्ध करत ‘कर सहाय्यक’ या पदावर आपली मोहोर उमटवली.

सात ते आठवेळा अपयश पचवून जिद्दीने तिने एकाच वेळी दोन परीक्षेत यश मिळवले. एमपीएससीच्या ‘कर सहाय्यक’ पदाच्या परीक्षेत ती मुलींमध्ये १९ वी, तर महसूल सहाय्यक-मंत्रालय लिपिक पदासाठी ओबीसी मुलींमध्ये राज्यात ती प्रथम आली.

घरात शैक्षणिक वातावरण नसतानाही स्वमेहनतीने यशाची किरणे आणण्यात ती यशस्वी झाल्याने ही बाब इतरांसाठी उमेद वाढवणारी आहे. (Earning position of an officer through hard work and determination Kiran prajapat succeeds in MPSC by taking care of his father's business nashik)

राजस्थान प्रांतातील प्रजापत कुटुंब केटरर्स व्यवसायासाठी देवळा येथे स्थायिक झाले. केटरर्स व्यवसायावर कुटुंबाचा गाडा चालत होता. कुटुंबातील किरण प्रजापत हिने घरकामात मदत करत आपल्या हुशारीची चमक दाखवली.

दहावीला ८५, तर बारावीला ८१ टक्के गुण तिने आपला रस्ता स्वतःच तयार करण्यास सुरवात केली. देवळा महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेत प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यास सुरवात केली.

गरिबीचा बाऊ न करता आणि मुलगी म्हणून मागे न राहता महाविद्यालयाच्या प्रत्येक उपक्रमात सहभाग घेत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारीपदाला गवसणी घालणे हे तिचे ध्येय बनले.

घरकाम आवरून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून वर्गात अव्वल क्रमांक राखण्यावर भर दिला. मधल्या काळात विवाहात मेंदी काढणे, त्यांना सजवणे, लहान मुलांच्या ट्युशन घेणे अशी कामे करत घरखर्च भागवण्यास मदत केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Kiran Prajapat celebrating success with family
Success Story: व्हाईट हाऊसमध्ये सुद्धा फेमस आहे 'पटेल ब्रँड'! कोण आहेत भारतीय वाईन किंग?

मोठा भाऊ सूरज सैन्यात भरती झाल्याने त्याचीही खंबीर साथ मिळाली. त्यामुळे युनिव्हर्सल फाउंडेशनमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. परीक्षा दिली की अपयशच पदरात पडायचे, असे सात ते आठ वेळा झाले.

परंतु जिद्द कायम ठेवल्याने हे लखलखीत यश मिळवता आल्याचे किरणने सांगितले. आई अशिक्षित आणि वडिलांचे किरकोळ शिक्षण त्यात मातृभाषा राजस्थानी असूनही मराठी आणि इंग्रजीवर प्रभुत्व मिळवत तिने यश मिळवले.

एक भाऊ पोलिस भरतीसाठी प्रयत्नशील असून, दुसरा व्यवसाय करत आहे. यश मिळविण्यासाठी मोबाईलचा उपयोग केवळ अभ्यासासाठीच करवा, इतर मोहजालात न अडकता स्क्रीनटाइम कमी ठेवा.

संदर्भ पुस्तके आणि वृत्तपत्रांचे वाचन करत आपले ज्ञान अद्ययावत ठेवा, असा संदेश किरण आपल्या मित्र-मैत्रिणींना देते.

Kiran Prajapat celebrating success with family
Success Story : साठीनंतर भाग्यम शर्मांनी घडवला इतिहास, आंतराष्ट्रीय पातळीवरही केलाय त्यांचा सन्मान, वाचा कोण आहेत त्या?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com