त्र्यंबकेश्‍वर भूकंपाचा विशेष अभ्यास

त्र्यंबकेश्‍वर भूकंपाचा विशेष अभ्यास
Published on: 
३६-२ भूकंपविषयक हालचालींचा त्र्यंबकमध्ये विशेष अभ्यास भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाचे पथक दाखल सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.१५ : नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर परिसरातील भूकंपविषयक हालचालींचा विशेष अभ्यास सुरू करण्यात आला आहे. कुंभमेळ्यानिमित्त लाखो भाविकांची संभाव्य गर्दी आणि उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा अभ्यास महत्त्वाचा ठरणार आहे. राज्य शासनाच्या विनंतीवरून भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने (जीएसआय) यासाठी त्र्यंबकेश्वरला विशेष पथक पाठवले आहे. त्या पथकाकडून त्र्यंबकेश्वर परिसरात तसेच त्याच्या परिघात चार अत्याधुनिक यंत्रांच्या माध्यमातून २४ तास भूगर्भातील हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. जानेवारी २०२७ पर्यंत हा अभ्यास सुरू राहणार असून त्यानंतर एक अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार असल्याची माहिती जीएसआयचे महासंचालक दिनेश गणवीर यांनी नागपूर येथे दिली. १६-१ का गरज आहे अभ्यासाची? - सिंहस्थ कुंभमेळ्यात लाखो भाविक, साधू-महंत आणि पर्यटक दाखल होणार असून राज्य सरकारने रस्ते, पूल, घाट तयार करणे सुरू केले आहे. पाणीपुरवठा, वीज, आरोग्य आणि वाहतूक व्यवस्थेसह विविध पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात आली आहेत. लाखो भाविकांच्या आणि केल्या जाणाऱ्या बांधकामाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या परिसरातील भूगर्भीय स्थिती तसेच संभाव्य भूकंपविषयक धोक्यांचा अभ्यास करण्याची गरज असल्याने या पथकास राज्य सरकारने पाचारण केले आहे. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.