NSK26H34499
जळगाव : बालगृहातील चिमुकल्यांनी तयार केलेल्या कापडी आकाशकंदील विक्री स्टॉलचे उद्घाटन करताना जिल्हाधिकारी रोहन घुगे. शेजारी अधीक्षक रवीकिरण अहिरराव आदी.
---------
बालगृहातील चिमुकल्यांच्या हाताला हक्काची बाजारपेठ
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कापडी आकाशकंदील विक्री स्टॉलचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.४ : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव येथील जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित, मुलांचे निरीक्षणगृह, बालगृहातील प्रवेशित मुलां-मुलींच्या कौशल्यगुण आणि कल्पकतेस चालना देत निरीक्षण गृहातील मुलां-मुलींनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक कापडी आकाश कंदिल व पणत्यांच्या प्रदर्शनी व विक्री स्टॉलचे आज जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
नंतर स्टॉलवरील प्रत्येक आकाशकंदीलाची आस्थेने पाहणी केली. बालकांशी संवाद साधून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. ते म्हणाले, बालगृहातील बालकांमध्ये प्रचंड सुप्त गुण आणि कौशल्य आहे. त्यांनी तयार केलेले कापडी आकाशकंदील व पणत्या अत्यंत आकर्षक आणि व्यावसायिक दर्जाचे आहेत. दिवाळी निमित्ताने बालकांमध्ये स्वावलंबनाची भावना निर्माण होणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे.
अधिक्षक रविकिरण अहिरराव यांच्या विशेष प्रयत्नांनी पूर्णपणे कापडी व पर्यावरण पूरक साहित्याचा वापर करुन कला व व्यवसाय शिक्षिका शोभना डोळे यांच्या मार्गदर्शन केले.
बालकांच्या प्रयत्नांचे कौतुक करुन त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी व त्यांच्यात उत्साह निर्माण करणेसाठी जळगांवकर नागरिकांनी बालकांनी तयार केलेले पर्यावरणपूरक आकाशकंदील खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
----