सातपूर- ग्राहकांना खाद्यतेल कमी दरात मिळावे, या हेतूने केंद्र सरकारने त्यावरील आयातशुल्क कमी केले. मात्र, शुल्क कपातीनंतरही ग्राहकांना कमी दरात खाद्यतेल उपलब्ध होत नसल्याचे बाजारातील चित्र आहे. त्यामुळे शुल्क कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचावा, यासाठी केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने खाद्यतेल प्रक्रिया उद्योगांची तपासणी मोहीम आखली आहे.