जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षण विभागाचं दुर्लक्ष

Education department neglects Zilla Parishad school Nashik News
Education department neglects Zilla Parishad school Nashik Newsesakal

पळसन (जि. नाशिक) : ग्रामपंचायत रोंघाणे जिल्हा परिषद शाळा (ZP School) सांबरखल येथे २०२१ ला अवकाळी पावसाने शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र याची तात्काळ दखल घेत गावातील नागरिकांनी शाळेच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाला पत्रव्यवहार करून संपूर्ण शाळेचे नुकसान झाल्याने शिक्षण घेण्यास जागा नाही, म्हणून नवीन इमारतीची मागणी केली होती.

मात्र या प्रश्नावर शिक्षण विभागाने कोणतीही कारवाई न करता 1 वर्ष होऊन 4 महिने ऊलटले तरीही या मागणीकडे दुर्लक्ष केले. आज तेथील विद्यार्थी, मंदिरात तर कधी एखाद्या घराच्या छोट्या खोलीत शिक्षण घेत आहेत, तरी या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून दि. 13 एप्रिल रोजी शिक्षणाचा अधिकार (Right to Education) मिळावा म्हणून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आपला हक्क मिळवून घेण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह पंचायत समितीत (Panchayat samiti) शाळा भरवली. सर्व जण श्रमजीवी संघटनेचा झेंडा हाती घेऊन गटशिक्षण अधिकारी यांच्या दालनात ठिय्या धरून बसले होते आणि जोपर्यंत शिक्षणासाठी इमारत मिळत नाही तोपर्यंत तुमच्या कार्यालयात शिक्षणासाठी जागा उपलब्ध करून द्या, अशी मागणी शाळेतील विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी केली होती.

Education department neglects Zilla Parishad school Nashik News
पाणीपुरवठा योजना सुरू करा; अन्यथा पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढू

यावर आज आंदोलन केले असता गटशिक्षण अधिकारी यांच्याकडून नवीन शैक्षणिक वर्षात 15 जून 2022 पूर्वी दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येईल, असे लेखी आश्‍वासन देण्यात आले. यावेळी सुरगाणा पोलीस निरीक्षक संदिप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निलेश बोडके,हेमंत भालेराव, प्रभाकर सहारे, तुळशीराम चौधरी, इंद्रजित बर्डे यांच्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Education department neglects Zilla Parishad school Nashik News
हिंदूंच्या सणाला वीजपुरवठा खंडित का केला जातो? प्रकाश चित्ते

आंदोलनात सहभागासाठी सुरगाणा तालुका अध्यक्ष राजू राऊत, सचिव दिनेश मिसाळ, महिलाप्रमुख मंगला गावित, नाशिक जिल्ह्य सरचणीस संजय शिंदे, नाशिक जिल्ह्य अध्यक्ष रामराव लोंढे, कार्यकर्ते वसंत घांगळे व सांबरखल गावातील विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com