Nashik News: शाळेत गुरुजींचे छायाचित्र लागलेत काय..! शिक्षण विभागाने मागवली माहिती

A sample of the information sought by the Department of Education from teachers.
A sample of the information sought by the Department of Education from teachers. esakal

Nashik News : शिक्षकांनी आपल्या वर्गखोलीत स्वतःचे छायाचित्र लावण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. निर्णयाबाबत समाजमाध्यम, शैक्षणिक वर्तुळात मोठ्या प्रमाणात टीका होऊनही शिक्षण विभाग मागे हटायला तयार नाही.

राज्यात निर्णयाची किती प्रमाणात कार्यवाही झाली, याची माहिती शिक्षण विभागाने नुकतीच मागवली आहे. याबाबत सोमवारी (ता. १८) शिक्षक संघटनांचे पदाधिकारी काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (education department sought information about photographs of teachers being put up in classroom nashik news)

राज्यातील काही शाळांमध्ये शिक्षकांनी आपल्या अखत्यारीत अनधिकृतपणे मानधन तत्त्वावर शिक्षक नेमल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे असल्याची चर्चा सर्वत्र आहे. त्यामुळे आपल्या खऱ्या शिक्षकांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी म्हणून राज्य सरकारने ‘आपले गुरुजी' या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षकांची छायाचित्रे वर्गात लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार किती शाळांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करून शिक्षकांची छायाचित्रे वर्गात लावण्यात आली याची माहिती शिक्षण विभागाने मागवली आहे.

‘आपले गुरुजी' या उपक्रमात शिक्षकांची छायाचित्रे वर्गात लावण्यावरून वाद निर्माण झाला होता. प्राथमिक शिक्षक संघासह अनेक शिक्षक संघटनांनी निर्णयाला कडाडून विरोध केला होता.

A sample of the information sought by the Department of Education from teachers.
NMC News: महापालिका मुख्यालयात फेब्रुवारीत पुष्पोत्सव; अंदाजपत्रकात 50 लाखांची तरतूद

त्यामुळे गेले काही दिवस शिक्षकांची छायाचित्रे लावण्याची मोहीम बंद होती. परंतु, राज्यातील किती शाळांतील वर्गांमध्ये शिक्षकांचे छायाचित्र लावण्यात आले याबाबत शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हानिहाय माहिती सादर करण्याचे लेखी आदेश दिले आहेत.

विधिमंडळासाठी माहिती हवीय

शिक्षकांची वर्गात छायाचित्रे लावण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबतची माहिती विधिमंडळात सादर करायची असल्याने शिक्षण विभागाकडून माहिती मागवण्यात आली आहे. शिक्षण संचालनालयाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी दीपक पाटील यांनी यासंबंधीचे परिपत्रक सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबईचे शिक्षण निरीक्षक यांना पाठवून तत्काळ माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

A sample of the information sought by the Department of Education from teachers.
Nashik Police Bharti: पोलिसपाटलांच्या मुलाखतीसाठी 225 पात्र; उद्या कागदपत्रांची पडताळणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com