School Safety Guidelines : सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य! प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही आणि महिला शिक्षकांची नेमणूक बंधनकारक
Mandatory CCTV Surveillance and DVR Footage Storage : बदलापूर घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने शाळांसाठी सीसीटीव्ही, महिला शिक्षक, समुपदेशन, आणि बालसुरक्षा नियमांसह नवीन कडक नियमावली लागू केली आहे.
नामपूर- ठाणे जिल्ह्यातील बदलापूरच्या खासगी शाळेत लहान मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने कठोर नियमावली लागू केली आहे.