शिक्षणाधिकारी लाच प्रकरण : जिल्हा रुग्णालयाला कोर्टाची नोटीस

nashik bribe case
nashik bribe caseesakal

नाशिक : जिल्ह्यातील एका शिक्षण संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २० टक्के अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याच्या मोबदल्यात आठ लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणात शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर - झनकर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (ACB) लाच घेताना पकडले होते. शिक्षणाधिकारी झनकर (education officer vaishali veer jhankar) यांच्या लाच प्रकरणात (bribe) पोलिस कोठडीत असताना कायम प्रकृती अस्वस्‍थतेची तक्रार करीत रुग्णालयात (hospital) दाखल झाल्या होत्या. आता त्यांच्या आजाराबाबत न्यायालयाने जिल्हा रुग्णालयाला (district hospital) नोटीस बजावत प्रशासनाकडून उपचाराबाबत सविस्तर माहिती मागविली आहे. दरम्यान वीर- झनकर यांच्या नियमित जामीन अर्जावरील सुनावणी शुक्रवार (ता.२०) पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

उपचाराबाबत सविस्तर माहिती मागविली

आठ लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणात शिक्षणाधिकारी डॉ. झनकर - वीर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने लाच घेताना पकडले होते. त्याचदिवशी सायंकाळी पोलिसात हजेरी लावल्यानंतर रात्रीतून गुंगारा देणाऱ्या झनकर दोन दिवस पोलिसांना सापडल्या नाहीत. तिसऱ्या दिवशी पोलिसांनी अटक केल्यानंतर लागलीच दोनदा त्यांनी आजारी असल्याने उपचारासाठी रुग्णालयात राहणे पसंत केले. साहाजिकच, पोलिसांना चौकशी करताच आली नाही. चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाल्यानंतर मंगळवारी कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयीन कोठडी मिळताच जामिनासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पहिल्याच दिवशी न्यायालयाने अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयाने जिल्हा रुग्णालय प्रशासनास नोटीस बजावली असून त्यात श्रीमती झनकर यांच्यावर केलेल्या उपचाराचा तपशील सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आधी अटक टाळण्यासाठी पोलिसांना गुंगारा देणाऱ्या झनकर अटक झाल्यानंतर पोलिस कोठडीऐवजी रुग्णालयाचा आसरा घेणाऱ्या वीर झनकर यांच्या आजाराची व त्यांच्यावरील उपचाराची माहिती पुढे येणार आहे.

nashik bribe case
नाशिक : शिकाऊ डॉक्टर रॅगिंगचा बळी? सुसाइड नोटमध्ये खुलासा

उपचारांबाबत संशय व्यक्त

नियमित अर्जावर आज (ता.१८) सरकार आणि बचाव पक्षातर्फे युक्तिवाद झाला. सरकार पक्षातर्फे त्यांच्या जामिनास विरोध दर्शविण्यात आला. त्यांच्या जिल्हा रुग्णालयातील उपचारावर संशय व्यक्त करण्यात आला. जिल्हा रुग्णालयाकडून आरोपींना पाठबळ दिले जाते असाही आरोप सरकारपक्षातर्फे करण्यात आला. त्यामुळे कोर्टाने ही सुनावणी दोन दिवस (ता.२०) पुढे ढकलली असून, थेट जिल्हा रुग्णालयास नोटीस बजावली आहे. या नोटिशीत झनकर यांच्या आजाराबाबत आणि उपचाराबाबतचा तपशील सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. एरवी अटक टाळण्यासाठी आरोपींकडून रुग्णालयाचा आधार घेतला असल्याच्या आरोप केला जात असला तरी न्यायालयाकडून रुग्णालयास नोटीस बजावण्याची ही पहिलीच घटना आहे. यामुळे जिल्हा रुग्णालयातील उपचारही चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

निलंबनाचा दुसऱ्यांदा प्रस्‍ताव सादर

शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर यांच्‍यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे कारवाई होताच वरिष्ठ पातळीवरून तातडीने निलंबनाचा प्रस्‍ताव मागविला होता. मात्र कायदेशीर त्रुटींमुळे निलंबनाची कारवाई अद्यापपर्यंत होऊ शकलेली नव्‍हती. पोलिस दलातर्फे झालेल्‍या कारवाईचा सविस्‍तर तपशिलाचा समावेश करून पुन्‍हा एकदा निलंबनाचा प्रस्‍ताव वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आल्‍याचे सूत्रांनी सांगितले. प्रस्‍तावात संशयित झनकर-वीर यांना सुनावलेली पोलिस कोठडी, न्‍यायालयीन कार्यवाहीचा तपशील नमूद केला आहे. दरम्‍यान उद्या (ता.१९) पुन्‍हा मोहरमनिमित्त सार्वजनिक सुट्टी आहे. त्‍यामुळे निलंबनाचे आदेश कधीपर्यंत जारी होतात, याकडे शिक्षण विभागाचे लक्ष लागून असेल.

nashik bribe case
नाशिक : तृथीयपंथीयांची टोल नाक्यावर सतत बळजबरी? वाद टोकाला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com