जिवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही - भानुदास रोकडे

जिवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही - भानुदास रोकडे
Published on: 
पान-१ अँकर फोटो : 32540/ 32545 नंदुरबार : वह्या वाटपप्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, युवराज पाटील, मुख्याध्यापक रवींद्र पाटील, शशिकांत पाटील, जयश्री ॲलेक्स. --------------- यशस्वी होण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे : ‘सकाळ’तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप नंदुरबार, ता. १६ : जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे असते. शिक्षणाने माणसाचे आयुष्य सर्वगुणसंपन्न बनते. त्यामुळे प्रत्येकाने शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे. काळाबरोबर चालण्यासाठी शिक्षणातून ज्ञान मिळवले पाहिजे. सामाजिक उपक्रमात ‘सकाळ’ नेहमीच अग्रेसर राहिले आहे. गरजू मुलांना वह्या व शालेय साहित्यवाटप करण्याचा ‘सकाळ’चा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे नंदुरबार जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनी सांगितले. ‘सकाळ’च्या नंदुरबार आवृत्तीच्या वर्धापन दिन सोहळ्यात विविध मान्यवरांकडून मिळालेल्या वह्या व शालेय साहित्याचे गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. शहरातील श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी शैक्षणिक संस्थेच्या राजे शिवाजी विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमास संस्थेचे सचिव युवराज पाटील, मुख्याध्यापक रवींद्र पाटील, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत पाटील, ब्लासम इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका जयश्री अलेक्स प्रमुख पाहुण्या होत्या. रोकडे म्हणाले, की विविध सामाजिक उपक्रम राबविणारे ‘सकाळ’ समाजाशी एकरूप झालेले वृत्तपत्र आहे. समाजातील विविध घटकांसाठी ‘सकाळ’कडून नवनवीन संकल्पना राबविल्या जातात. विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा विविध घटकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही ‘सकाळ’ची भूमिका राहिली आहे. गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून ‘सकाळ’ने शिक्षणााठी प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. विद्यार्थ्यांनीही राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीत भूमिका निभवावी. युवराज पाटील यांनी ‘सकाळ’च्या माध्यमातून वह्या व शालेय साहित्य मिळल्याने गरजू मुलांना शिक्षणात मदत झाली आहे. यातून त्यांना प्रोत्साहन मिळाले असून, या साहित्याचा वापर करून ते जीवनात प्रगती साधतील, असे सांगितले. ‘सकाळ’चे विलास पवार यांनी प्रास्ताविक केले. अर्चना गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. शेषराव गजभिये यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com