येवला- खासगी अनुदानित शाळांमध्ये लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक या शिक्षकेतर कर्मचारी भरतीसाठी शासनाने सुधारित आकृतिबंध जाहीर केला खरा, पण लागलीच पत्र काढून ही भरती स्थगित करण्याचे आदेश दिले. यामुळे हजारो पदे रिक्त असल्याने शाळांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता शिक्षकांप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती देखील पोर्टल मार्फत होणार असल्याचे सांगितले जात आहे, यामुळे इच्छुकांचे धाबे दणाणले आहे.