नाशिक- अकरावीच्या ऑनलाइन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत मुदतवाढ दिल्यानंतर मंगळवारी (ता. ३) संकेतस्थळाचे अद्ययावतीकरण सुरू होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरता आला नाही. शिक्षण विभागाने यापूर्वीच नोंदणीसाठी मुदतवाढ दिली असून, त्यानुसार गुरुवार (ता. ५) दुपारी २ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणीची संधी उपलब्ध असेल.