इगतपुरी- ज्या प्राथमिक शिक्षकांनी नोकरीला लागून अनुक्रमे १२ किंवा २४ वर्षे पूर्ण केली आहेत, अशा शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणीसाठी प्रशिक्षण घेणे आवश्यक असते. यंदा प्रथमच शिक्षकांनी प्रशिक्षण वर्गात प्रत्यक्ष सहभागी होत असतानाच राज्यभर एकाच वेळी राज्यस्तरीय ऑनलाइन चाचणी दिली जाणार आहे.