नामपूर- राज्यात अनेक वर्षांपासून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत. त्यामुळे एमपीएससी परीक्षेच्या धर्तीवर होणाऱ्या अभियोग्यता परीक्षेला अनन्यसाधरण महत्त्व आहे. सव्वादोन लाखाहून अधिक डी.एड./बी.एड. पदवीधारक यंदा परीक्षेला सामोरे जाणार असल्याने शिक्षकी व्यवसायातील वाढती स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने अधोरेखित झाली आहे. जवळपास तीन वर्षांनंतर राज्यात भावी शिक्षकांसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी होत आहे.