नाशिक- सहायक प्राध्यापकपदाच्या पात्रतेसाठी जूनमध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर अशा दोन परीक्षा होणार आहेत. येत्या रविवारी (ता. १५) महाराष्ट्र व गोव्यात महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) होणार आहे. तर राष्ट्रीय स्तरावरील यूजीसी-नेट परीक्षा २५ ते २९ जूनदरम्यान होईल. या परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्राचा तपशील व परीक्षेसंदर्भातील इतर सूचना नमूद केल्या आहेत.