मालेगाव येथील किदवाई रस्त्याजवळील इस्लामपुरा भागातील पहिल्या गल्लीतील दुकानास आग लागली. आगीत आठ दुकाने भस्मसात झाली. लाखो रुपयांचे आगीत नुकसान झाले आहे. सकाळी साडे सातला शॉर्टसर्किटने आग लागल्याचे सांगितले जात आहे.येथील किदवाई रस्त्यावरील इस्लामपुरा भागात सकाळी साडेसातला कोहिनूर फर्निचर या दुकानाला शॉर्टसर्किटने अचानक आग लागली.