केवायसीसाठी मुदतवाढ द्या!

केवायसीसाठी मुदतवाढ द्या!
Published on: 
धुळे : मुख्य अंकातील पानासाठी.... -- शालार्थ पोर्टलवर ई- केवायसीसाठी मुदतवाढ द्या! -- शिक्षकांच्या वेतन समस्येवर पुरोगामी संघटनेची निवेदनातून मागणी सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १३ : शालार्थ पोर्टलवर ई- केवायसी पूर्ण करण्यासाठी मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या निवेदनाद्वारे शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे करण्यात आली आहे. राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन शालार्थ प्रणालीद्वारे केले जाते. शालेय शिक्षण विभागाने ऑक्टोबरपर्यंत ई- केवायसी पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, विविध अडचणींमुळे अनेक शिक्षकांची ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. महिला शिक्षिकांच्या नावातील बदलासाठी राजपत्र बनवले आहे. परंतु, जिल्हा परिषदेचे लेखी आदेश वेळेत न निघाल्यामुळे व सेवापुस्तकात नोंद न झाल्यामुळे ई- केवायसी रखडले आहे. तसेच, आधार कार्ड अपडेटमधील अडचणी, जिल्हा लॉगिनवर पाठवलेल्या प्रस्तावांच्या मंजुरीस होणारा विलंब आणि नवीन शिक्षण सेवकांच्या पदनिर्मितीसह सेवापुस्तक नोंदी व ई- केवायसी प्रक्रियेसाठी अतिरिक्त वेळ लागणे या प्रमुख अडचणी आहेत. येणारा दसरा, धम्मचक्र परिवर्तन दिन व दिवाळी हे महत्त्वाचे सण विचारात घेता कार्यरत व पद मंजूर असलेल्या शिक्षकांचे वेतन रोखणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे ९ ऑक्टोबरच्या परिपत्रकानुसार सवलत देऊन तूर्तास राजपत्र ग्राह्य धरून वेतन अदा करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती लिपी शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांना ई- मेलद्वारे पाठविण्यात आल्या आहेत. संघटेनचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांच्या स्वाक्षरीने निवेदन पाठवण्यात आल्याची माहिती राज्यप्रमुख संघटक तथा जिल्हाध्यक्ष भूपेश वाघ, राज्य उपाध्यक्ष रवींद्र बोरसे, सरचिटणीस ऋषिकेश कापडे, कार्याध्यक्ष प्रशांत महाले, विभागीय अध्यक्ष रवींद्र सैंदाने, सचिव रवींद्र देवरे, महिला अध्यक्ष सुरेखा बोरसे, सरचिटणीस प्रतिभा वाघ यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com