Nashik Election News: ज्येष्ठ अन्‌ दिव्यांगांचे घरूनच मतदान; जुलैपासून निवडणूक आयोग ‘ॲक्शन मोड’वर

disabled people
disabled peopleesakal
Updated on

Nashik Election News : आगामी निवडणुकांमध्ये ८० वर्षांहून अधिक वयाचे ज्येष्ठ आणि दिव्यांग बांधवांना मतदान केंद्रावर न येता त्यांना घरबसल्या टपाली मतदानाची सोय करण्याचे नियोजन सुरू आहे.

सध्या राज्यातील निवडणूक विभाग ‘ॲक्शन मोड’वर असून, विविध पातळ्यांवर तयारीला सुरवात झाली आहे. (Elderly and disabled vote from home Election Commission on Action Mode from July Nashik Election News)

विविध कारणांमुळे दीड-दोन वर्षांपासून निवडणुका लांबलेल्या महाराष्ट्रात निवडणूक विभागातर्फे मात्र जोरदार तयारी सुरू झाली आहे. एकाच वेळी अधिकारी प्रशिक्षण, याद्यांचे पुनरीक्षण, मतदान यंत्राची तपासणी आणि प्रशिक्षण अशा विविध पातळ्यांवर तयारीला वेग आला आहे.

त्यात जिल्हाधिकाऱ्यांसह निवडणूक अधिकाऱ्यांचे पुण्यात दोन दिवसांपासून प्रशिक्षण सुरू आहे. त्यापाठोपाठ प्रांताधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांचेही प्रशिक्षण होणार आहे.

मतदान यंत्राची तपासणी

राज्यात एकाचवेळी सुरू झालेल्या या तयारीचे पडसाद नाशिकलाही दिसत आहेत. नाशिकला निवडणूक आलेले उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंप्रीसय्यद भागातील निवडणूक विभागाच्या गुदामात या सगळ्या प्रशासकीय तयारीची धावाधाव सुरू आहे.

नाशिक जिल्ह्यातील निवडणुकांसाठी साडेसहा हजार कंट्रोल युनिट आणि दहा हजारांहून अधिक बॅलेट युनिट आले आहेत. त्या सगळ्यांची तपासणी करण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे.

निवडणूक यंत्रांची सगळी तपासणी करण्याचे काम करताना निवडणुकीच्या कामासाठी लागणारी जागा, गुदामासह मतमोजणीच्या केंद्रावरील अनुषांगिक सुविधा उपलब्ध करून देत त्याचे नियोजन सुरू आहे.

मतदान यंत्रांची ने-आण आणि त्याची तपासणी करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. यानंतर आता प्रांताधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि त्यानंतर क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू होईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

disabled people
Nashik ZP News : ‘ZP’च्या शासकीय निवासस्थानी ‘स्वयंसेवी’च्या प्रतिनिधींचे वास्तव्य?

याद्यांचे पुनरीक्षण

एका बाजूला मतदान यंत्रांची तपासणी सुरू असताना दुसऱ्या बाजूला मतदार याद्यांचे अद्यावतीकरणही सुरू झाले आहे. निवडणुकीसाठी याद्या पुनरीक्षणाच्या कामाला वेग आला आहे.

त्यात १ जुलैपासून निवडणूक विभागाचे अधिकारी घरोघरी जाऊन माहिती संकलित करीत याद्यांचे अद्ययावतीकरण करणार आहे. साधारणतः १ जानेवारी २०२४ ही तारीख गृहीत धरून त्यानुसार याद्यांचे अद्यावतीकरण करण्यात येणार आहे.

मतदार यादीतील नावांची तपासणी हे महत्त्वाचे काम सध्या सुरू झाले आहे. जुलैपासून बीएलओ घरोघरी फिरून ८० वर्षांहून अधिक वयाचे मतदार, दिव्यांग मतदार तसेच मृत मतदारांची माहिती संकलित करीत त्यानुसार मतदारयाद्या अद्ययावत करणार आहेत. छायाचित्रांची

दुरुस्ती, जुन्या नावांचे पत्ते बदल, नावातील बदल, या सगळ्यांचा आढावा घेत मतदारयाद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे.

टपाली मतदान

आगामी निवडणुकांत ८० वर्षांहून अधिक वयाच्या ज्येष्ठांना मतदान केंद्रावर बोलविण्याऐवजी त्यांना घरीच टपाली मतदान पत्रिका उपलब्ध करून देण्याचे निवडणूक विभागाचे नियोजन आहे. याच न्यायाने दिव्यांग मतदारांनाही अशाच प्रकारच्या टपाली मतपत्रिका उपलब्ध करून देत, घरीच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

त्याचे महत्त्वाचे नियोजन करण्यासाठीचा आढावा घेतला जात आहे. अशा वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांची संख्या विचारात घेऊन त्यानुसार नियोजन होणार आहे.

"निवडणुकीच्या तयारीचे कामकाज सुरू झाले आहे. १ जुलैपासून हे कामकाज प्रत्यक्ष दिसायला लागेल, तर ४ आणि ५ जुलैपासून या प्रक्रियेला गती येईल. एकाचवेळी प्रशिक्षण, याद्या अद्ययावतीकरण आणि घरोघरी फिरून माहिती संकलन असे काम सुरू होईल."

- डॉ. शशिकांत मंगरुळे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक)

disabled people
Nashik ZP News: 15 व्या वित्त आयोगाच्या न येणाऱ्या निधी नियोजनाला अखेर ब्रेक!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com