YEO26B26980
येवला : ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कार्यक्रमात सहभागी ज्येष्ठ नागरिक.
-----------------
३६-३
सत्य आणि ईश्वर हीच जीवनाची मूळ तत्त्वे
नीता दीदी यांचे प्रतिपादन ः येवल्यात ज्येष्ठ नागरिक दिन साजरा
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. ९ : सत्य आणि ईश्वर हीच जीवनाची मूळ तत्त्वे आहेत. जय जवान, जय किसान हे दोन मंत्र आजही आपल्याला प्रेरणा देतात. हाच पवित्र संदेश आपण पुढच्या पिढीला दिला पाहिजे. संयम, शांती, अध्यात्म आणि लोभ विरहित जीवन जगल्यानेच माणसाला खरे आणि आनंदी जीवन जगता येते, असे प्रतिपादन ब्रह्मकुमारी नीता दीदी यांनी केले.
येथील श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघातर्फे स्थानिक सरसेनापती उमाबाई दाभाडे सभागृहात महात्मा गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री जयंती, संत ज्ञानेश्वर जयंती आणि ज्येष्ठ नागरिक दिनाच्या एकत्रित कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.ज्येष्ठांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांनी ‘वय वाढते तसा उत्साहही वाढतो, हेच ज्येष्ठत्वाचे खरे रहस्य असल्याचे सांगितले.
अध्यक्षस्थानी रावसाहेब दाभाडे होते. सरचिटणीस कृष्णाजी शिंदे, नारायण (मामा) शिंदे, तालुकाध्यक्ष गुमानसिंग परदेशी, सीताराम निकुंभ, सूरजमल करवा, डॉ. विलास दाभाडे, किशोर कुमावत आदी उपस्थित होते. प्रारंभी दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहत ‘खरा तो एकची धर्म’ या प्रार्थनेने सुरुवात करत मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
ज्येष्ठ नागरिक नंदलाल भांबारे, प्रल्हाद कोतवाल यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. कृष्णा शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सीताराम निकम यांनी परिचय करून दिला. गुमानसिंग परदेशी यांनी सूत्रसंचालन केले. अशोक परदेशी, प्रतापराव देशमुख, वसंत सुतार, ज्ञानेश्वर भुजबळ, दिनकर संभेराव, पुंजाराम कदम, मुरलीधर जाधव, सुंदरलाल वाघ, शशिकांत मालपुरे, चंद्रकांत हिवाळे, मधुकर भारती, श्याम बागूल, प्रमोद आमोदकर, नामदेव कोल्हे, प्रभाकर पवार, त्र्यंबक शिखरे, शिवाजी लोणारी आदी उपस्थित होते.
---------------