आडगाव येथे ८० वर्षांवरील ३० ज्येष्ठ नागरिकांचा गौरव

आडगाव येथे ८० वर्षांवरील ३० ज्येष्ठ नागरिकांचा गौरव
Published on: 
OZM26B14792 आडगाव ः येथे ८० वर्षांवरील ३० ज्येष्ठ नागरिकांच्या गौरवप्रसंगी उत्तमराव कडलग, कार्याध्यक्ष रामनाथ मोरे, सचिव श्रीकृष्ण आवारे, एकनाथ तपकिरे, मनोहर मोगल, तुकाराम बोराडे, अशोकराव होळकर आदी. ----------------- आडगावात ८० वर्षांवरील ३० ज्येष्ठांचा गौरव महात्मा गांधी जयंती व जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सत्कार सोहळा सकाळ वृत्तसेवा ओझर,ता.३० ः महात्मा गांधी जयंती आणि जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून भारतनगर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे (आडगाव) परिसरातील ८० वर्षांवरील ३० ज्येष्ठ नागरिकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. साने गुरुजींच्या ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ या प्रार्थनागिताने सुरुवात झाली. इस्कॉन ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक होळकर यांनी मार्गदर्शन केले. वाढत्या वयात मानसिक स्वास्थ्य आणि समाधानी जीवनशैली कशी जपावी यावर त्यांनी प्रकाश टाकला. सोमा हॉस्पिटलचे डॉ. अनिरुद्ध ढोकरे यांनी वाढत्या वयातील किडनीचे आजार, योग्य आहारविहार, नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत सविस्तर तांत्रिक व व्यावहारिक मार्गदर्शन केले. ​कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उत्तमराव कडलग, कार्याध्यक्ष रामनाथ मोरे, सचिव श्रीकृष्ण आवारे, एकनाथ तपकिरे, सहकार्याध्यक्ष मनोहर मोगल, संचालक दौलतराव शिंदे, किसनराव धारबळे, शंकरराव मते, धनवटे रोकडे, तानाजी पाटील, मधुकर कदम, मार्गदर्शक अशोकराव पोटे, रामभाऊ निकम, श्रीमती बोरोले, श्रीमती बैरागी, कृषिभूषण तुकाराम बोराडे, फेस्कामचे सचिव प्रकाश महाजन, लोकज्योती ज्येष्ठ नागरिक संघाचे खजिनदार जितेंद्र येवले, शिवाजीराव होळकर,भाईदास पाटील, ॲड. ह्याळीज व काशिनाथ गांगुर्डे आदींचे विशेष सहकार्य लाभले. ​विष्णू लोहकरे यांनी सूत्रसंचालन केले. ----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com