Crime Update : पोलिसांच्या नावाने ज्येष्ठाला लुटले

crime news
crime news esakal
Updated on

नाशिक : शहरात पोलिसांच्या नावाने व तसे गणवेश घालून ज्येष्ठांना गंडा घालण्याचे प्रकार सुरूच आहेत. आठवड्यापासून पोलिसांच्या नावाने सुरू असलेल्या लुटमारीमुळे ज्येष्ठांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. (Elderly man robbed in name of police Crime Update nashik Latest Marathi News)

crime news
गटारींचे पाणी थेट गोदापात्रात; रामसेतूसह यशवंत महाराज पटांगणावरील चित्र

जेल रोड भागातील लोखंडे मळ्यात काही दिवसांपूर्वीच रस्त्याच्या कडेला बसलेल्या ज्येष्ठ नागरिकाला धमकावून दोघा पोलिसांच्या वेशातील भामट्यांनी गंडविले. रोज एक- दोन प्रकार सुरूच आहेत. पोलिस असल्याची बतावणी करून ८५ वर्षीय वृद्धाकडील ८५ हजारांचे दागिने दोघा युवकांनी हातोहात लंपास केले. अलीकडच्या काळातील ही तिसरी घटना असून, ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर पोलिसांसमोर तोतयांचे आव्हान उभे ठाकले आहे.

शांतिलाल चुनिलाल मुथ्था (वय ८५, रा. रौनक बेकरी, शॉप नंबर ६, स्वस्तिक प्लाझा अपार्टमेंट, स्ट्रॉबेरी शाळेसमोर, कडवेनगर, पाथर्डी फाटा) सकाळी अकराला सप्तश्रृंगी हॉस्पिटल जवळील लाल महल हॉटेल येथून रस्ता ओलांडण्यासाठी वाहनांची वर्दळ कमी होण्याची वाट पाहत होते.

या वेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोघे युवक आले. त्यांनी तोंडाला मास्क लावले होते. पोलिस असल्याची बतावणी करत दोघांनी मुथ्था यांच्याकडील सोन्याची चेन व तीन अंगठ्या, असा ८५ हजारांचा ऐवज हातोहात काढून घेतला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

crime news
Dhule : सेंधव्याजवळ 50 लाखांचे सागवान जप्त; विनापरवाना सुरू होती वखार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com