महाविकास आघाडीला जागा देवू केले.. आणी दिला भोपळा

महाविकास आघाडीला जागा देवू केले.. आणी दिला भोपळा
Published on: 
टुडे पान एकसाठी जिल्हा बँकेच्या बातमी सोबत घ्यावी... --------- महाविकास आघाडीला महायुतीकडून ‘भोपळा’ ----- एकही जागा न देता फसवणूक केल्याचा आरोप सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १७ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीची शुद्ध फसवणूक केली आहे. माघारीच्या शेवटपर्यंत आम्हाला जागा देवू असे सांगून उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास सांगितले आणि माघारीच्या १५ मिनिटे आधी भाजप-शिवसेना महायुतीच्या नेत्यांनी सांगितले की, एकही जागा तुम्हाला नाही. हा आमचा विश्‍वासघात महायुतीने केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. जिल्हा बँकेत मंगळवारी (ता.१७) दुपारी अडीचला जिल्हाध्यक्ष पाटील, त्यांच्या पत्नीने व महाविकास आघाडीच्या इच्छूक उमेदवारांनी माघार घेतली. त्यावेळी ते बोलत होते. निवडणुकीच्या जागा वाटपात निवडणूक सर्वपक्षीय होऊन बिनविरोध होण्यासाठी महाविकास आघाडीला अगोदर तीन जागा देऊन, नंतर दोनन जागा, नंतर एक जागा देवू, असे विधान महायुतीच्या नेत्यांनी केले हेाते. मात्र, माघारीच्या दिवशी मंगळवारी महायुतीने एकही जागा सोडली नसल्याचे लक्षात येताच जिल्हाध्यक्ष पाटील यांनी संताप व्यक्त केला. जागा देण्याचे आमीष दाखवीत पद्मजा राजीव देशमुख यांचाही अर्ज महिला मतदार संघातून भरण्यास महायुतीने सांगितले. त्यामुळे आम्हाला खात्री झाली की आपल्याला जागा मिळतेय. त्यामुळे आम्ही इतर ठिक़ाणी अर्ज भरले. आणी त्यांनी सांगितलेल्या ठिकाणावरून माघार घेतली. दुपारी पावणेतीनला आमची माघारी झाल्यानंतर त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडीला एकही जागा नाही. ही आमची फसवणूक आहे. कॉंग्रेसने सांगितले होते की, भाजप बरोबर जावू नका. मात्र, भाजप आम्हाला जागा देईल, अशी आशा होती. परंतु, त्यांनी विश्‍वासघात केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.