निवडणूक साक्षरता मंडळातर्फे विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचे आयोजन

निवडणूक साक्षरता मंडळातर्फे विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचे आयोजन
Published on: 
निवडणूक साक्षरता मंडळातर्फे विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा नंदुरबार, ता. १८ : जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळामार्फत निबंध आणि प्रश्नमंजूषा स्पर्धा होणार आहेत. स्पर्धांच्या आयोजनाबाबत सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी दिली. आहे. तरुण मतदार तसेच विद्यार्थ्यांत लोकशाही मूल्ये रुजवणे या स्पर्धांमागील मुख्य उद्देश आहे. ही स्पर्धा शैक्षणिक संस्थास्तर, विधानसभा मतदारसंघस्तर आणि जिल्हास्तर अशा तीन टप्प्यांवर होणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे. संस्थास्तरीय फेरी १८ ते २७ नोव्हेंबर, विधानसभा मतदारसंघस्तरीय फेरी ७ ते १२ डिसेंबर, जिल्हास्तरीय अंतिम फेरी १४ ते १८ डिसेंबर, निकाल जाहीर करणे व प्रमाणपत्र वितरण १९ ते २२ डिसेंबर याप्रमाणे वेळापत्रक आहे. संस्थास्तरीय फेरीतून दोन्ही स्पर्धामधून प्रत्येक शाळा व महाविद्यालयातून दोन विद्यार्थ्यांची निवड होईल. त्यानंतर विधानसभा मतदारसंघस्तरावरून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून दहा विद्यार्थी निवडले जातील. मतदार संघस्तरावर निवडलेले हे विद्यार्थी जिल्हास्तरीय अंतिम फेरीत सहभागी होती. निकालानंतर तिन्ही स्तरांमधील विजयी विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.